बीड : विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार करावं आणि त्यांना सरकारमध्ये सामील करून घ्यावं. अशी मागणी शिवसंग्रामचे आष्टी येथील तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली. विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना युतीतील घटक पक्ष आहे. त्यामुळे विनायक मेटे यांच्यानंतर किमान त्यांच्या पत्नीला तरी संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहेत. (Vinayak Mete News)
काय म्हणाले चौधरी?
बीड जिल्ह्यातील आष्टी येथे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेचे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चौधरी म्हणाले, स्व.विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावं आणि सरकारमध्ये सामील करून घ्यावं. अशी मागणी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
चौधरी म्हणाले की, मेटे साहेब मला 12 तारखेला भेटले होते, तेव्हा ते बोलले होते की आपल्याला दुसऱ्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल. त्यामुळं आता साहेब राहिले नाहीत, तेव्हा ज्योती ताईला आमदार करुण सरकारमध्ये सामील करून घ्यावे. अशी मागणी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे. (Vinayak Mete Todays News)
राष्ट्रवादीकडूनही मागणी
दरम्यान, राष्ट्रवादीकडूनही मेटेंच्या पत्नीला विधानपरिषदेवर घेण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ही मागणी केली. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना 14 ऑगस्टला घडली होती. खोपली इथल्या बोगद्याजवळ हा अपघात घडला होता. आज पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी हा अपघात झाला होता. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.