Vikram Gokhale Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; कुटुंबीयांनी दिलं स्पष्टीकरण

ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांनी मोठी अपडेट दिली आहे.

वृत्तसंस्था

Vikram Gokhale Latest News : ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांनी अपडेट दिली आहे. सध्या विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. काही माध्यमांमधील वृत्त आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर गोखले यांच्या प्रकृतीबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाली होती. (Vikram Gokhale Daughter)

गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

रात्री उशीरा त्यांची तब्येत खालवली असल्याचं वृत्तही आलं. काही बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटवरून प्रसारमाध्यमांनी त्यांचे निधन झाल्याचं वृत्त दिलं. दरम्यान, सोशल मीडियावरील चर्चेनंतर अखेर कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांच्या मुलीने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.

'ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर असून अद्याप त्यांचे निधन झालेले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा,' अशी माहितीत्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. तसेच कृपया त्यांच्या निधनाबाबत अफवा पसरवू नये, असं आवाहन देखील गोखले यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे.

विक्रम गोखले यांचा अल्पपरिचय

विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी झाला. त्यांनी चित्रपट मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले आहे. गोखले यांना चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT