CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडून जाणून घेतलं भविष्य? दौरा गोपनीय ठेवण्याचा होता प्रयत्न

साई दर्शनानंतर मुंबईकडे रवाना होणारे मुख्यमंत्री अचानक वावीजवळच्या महादेव मंदिरात वळाले.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam TV

नाशिक : शिर्डी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परतताना ज्योतिषाकडून आपलं भविष्य घेतल्याची चर्चा आहे. साई दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा थेट वावी जवळच्या महादेव मंदिरात गेला होता. मंदिरात महादेवाला अभिषेकानंतर मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची चर्चा आहे.

शासकीय दौऱ्यानुसार साई दर्शनानंतर मुंबईकडे रवाना होणारे मुख्यमंत्री अचानक वावीजवळच्या महादेव मंदिरात वळाले. दौऱ्यात अचानक झालेल्या बदलामुळे यंत्रणेचीही धावपळ झाली. दौरा गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न होता. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde
'राज्यपालांनी पदाची अब्रू घालवली';राजू शेट्टींनी राष्ट्रपतींना पत्र लिहत केली कोश्यारी यांना हटविण्याची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीत पोहोचून सपत्नीक साईबाबांच्या दरबारात हजेरी लावून साईंचे दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ते मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र अचानक त्यांचा ताफा सिन्नर तालुक्यातील वावी जवळच्या मिरगावच्या दिशेने रवाना झाला.

मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. मुंबईत नियोजित बैठका असूनही त्यांनी सगळ्या बैठका अचानक रद्द केल्या आणि ते हेलिकॉप्टरने शिर्डीला पोहोचले. तिथे सपत्निक साईंचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मुंबईकडे रवाना होणं अपेक्षित असताना त्यांचा ताफा सिन्नरच्या मिरगावच्या शिवारात वळाला. तिथे त्यांनी एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याचं बोललं जात आहे.

CM Eknath Shinde
Jayant Patil : कर्नाटक सरकारकडून गैरवापर सुरु, लोक त्याला बळी पडणार नाहीत: जयंत पाटील

ताफा सिन्नरकडे वळाल्यानंतर अधिकाऱ्यांनाही मुख्यमंत्री नेमकं कुठे निघालेत, याची कल्पना नव्हती. मात्र मिरगावच्या शिवारात पोहचल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या या मिरगाव दौऱ्याची अत्यंत गोपनियता ठेवण्यात आली होती. तिथे मुख्यमंत्री एका ज्योतिषाला भेटले आणि त्यांनी त्यांचं भविष्य जाणून घेतल, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com