Vidhyanand Bapat Attack Case Santosh Chavan’s Criminal Record Under Police Scanner 
मुंबई/पुणे

विद्यानंद बापट हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! मारहाण करणारा संतोष चव्हाण सराईत गुन्हेगार; गुन्ह्यांची कुंडली आली बाहेर

Who Is Santosh Chavan: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरणात संतोष चव्हाणला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गु्न्हे शाखेने चव्हाणची कुंडली बाहेर काढलीय.

Bharat Jadhav

  • गणेश मंडळाचा कार्यकर्ता असलेला संतोष चव्हाण सराईत गुन्हेगार

  • तीन वर्षांपूर्वी संतोष चव्हाणने वडिलांनाही केली होती

  • संतोष चव्हाण हा कोथरूडच्या राऊतवाडीतील गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष

विद्यानंद बापट यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत हल्लेखोराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून आरोपी संतोष चव्हाण यांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आलीय. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाणची गु्न्हेगारी कुंडली बाहेर आलीय. गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून बापट यांनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर चव्हाण याने हल्ला केला का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे? मात्र हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.

पाच ते सहा गुन्हे दाखल

संतोष चव्हाण हा राऊतवाडी परिसरात राहणारा आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संतोष चव्हाणला अटक केलीय. दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार चव्हाणविरोधात पुणे शहरात आधीच पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीय. मारामारी करणे कट रचने यासारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी याआधीच त्याला ताब्यात घेतलं होतं.

तीन वर्षांपूर्वी संतोष चव्हाणने वडिलांनाही मारहाण केली होती. तेव्हापासून वडिलांनी त्याच्यासोबतचा संपर्कही तोडला होता. त्यामुळे बापट यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चव्हाणची पूर्वीची गुन्हेगारी नोंदही पोलिसांच्या तपासाचा भाग बनलीय. संतोष चव्हाण हा कोथरूडमधील राऊतवाडी येथील एका गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती मिळालीय.

हल्ल्यानंतर मोबाईल बंद करून फरार झाला होता

बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हा हनुमाननगर परिसरात काही मित्रांना भेटला. त्यानंतर त्याने मोबाईल फोन बंद केला आणि पोलिसांच्या संपर्काबाहेर राहण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेत त्याला अटक केली. संतोष चव्हाण याच्यावर कारवाई झाल्यानंतर आता पोलिसांकडून हल्ल्याच्या संपूर्ण पार्श्वभूमीचा तपास केला जातोय. बापट यांच्यावर हल्ला करण्यामागे नेमका कोणता उद्देश होता, चव्हाणसोबत आणखी कोणाचा सहभाग होता का आणि या घटनेमागे अन्य काही कारण आहे का याचा तपास केला जातोय.

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केल्यानंतर संतोष चव्हाण याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. विद्यानंद बापट गणेशोत्सव आणि डीजेबाबत टीका करत असल्याच्या रागातून आपण हे कृत्य केल्याचे त्याच्या वक्तव्यावरून दिसून आले. विद्यानंद बापट टीका करतो, त्याला आणखी मारायलं पाहिजे. त्याला सुट्टी देणार नाही, त्याला आणखी मारणार आहे,” असे चव्हाण म्हणाला होता. पुण्यातील गणेशोत्सवाबाबत कोणी बोलले तर त्याला अशाच प्रकारे कानाखाली मारणार असल्याचेही त्याने म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

SCROLL FOR NEXT