Navi Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

VIDEO : लग्नासाठी जमलेले वऱ्हाडी एकमेकांशी भिडले; क्षुल्लक कारणावरुन जोरदार राडा

वऱ्हाडी नाचत असताना एका मुलीला एका मुलाचा धक्का लागला. यावरुन हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : लग्नसमारंभ म्हटलं की मानपान आला. या मानपानाच्या गडबडीत अनेकांची नाराजी वधू-वराच्या कुटुंबियांना सहन करावी लागते. अनेकदा छोटेमोठे वादही होतात. मात्र नवी मुंबईत लग्न समारंभात क्षुल्लक कारणावरुन मोठा राडा झाल्याचं पाहायलं मिळालं आहे. लग्नासारख्या शुभ मंगलसमयी रस्त्यावर तुंबळ हाणामारी झाल्याचं दृष्य आजूबाजूला राहणाऱ्यांना लोकांनी पाहिलं. (Viral Video)

लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना नवी मुंबईतील सीवूड नेरुळ येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. लग्नासाठी जमलेल्या दोन गटात हा राडा झाला. वऱ्हाडी नाचत असताना एका मुलीला एका मुलाचा धक्का लागला. यावरुन हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. (Latest News Updates)

सीवूड नेरुळमधील सेक्टर 44 येथील लग्न समारंभाच्या हॉल बाहेरच ही सर्व घटना घडली. हॉलच्या समोरील इमारतीत राहणाऱ्या काही नागरिकांना या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. हॉलच्या कर्मचाऱ्यांना हा सुरु असलेला वाद सोडवण्याचाही प्रयत्न केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

लग्न सोडून सगळं वऱ्हाड रस्त्यावर उतरलं होतं. त्यामुळे गाड्यांची ये-जा देखील काही वेळ थांबली होती. यासंबंधी अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नसून हाणामारीनंतर वाद मिटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT