Himachal Result 2022: हिमाचलमध्ये काँग्रेसचा डाव मोडणार? भाजपचं आव्हान मोडलं, पण घरातल्यांनीच घेरलं

वीरभद्र यांच्या नावावर निवडणूक लढवली गेली, तर मुख्यमंत्रिपदाचा अधिकारही वीरभद्र कुटुंबाचाच आहे.
pratibha singh
pratibha singh Saam TV
Published On

Himachal Election Result 2022: हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये (Congress) मुख्यमंत्री पदाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं असलं तरी सत्तास्थापनेचा तिढा वाढत चालला आहे. काँग्रसमधील मतभेदांमुळे हातातोडांशी आलेला घास हिरावला जातो की काय अशी स्थिती सध्या हिमाचमध्ये काँग्रेसची झाली आहे.

प्रतिभा सिंह यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबातून कुणी मुख्यमंत्री झाला नाही तर पक्षात फूट पडेल. वीरभद्र कुटुंबासोबत 25 आमदार असल्याचा दावा प्रतिभा सिंह यांच्या कॅम्पने केला आहे.

वीरभद्र यांच्या नावावर निवडणूक लढवली गेली, तर मुख्यमंत्रिपदाचा अधिकारही वीरभद्र कुटुंबाचाच आहे. सध्या केंद्रीय पर्यवेक्षक आणि प्रभारी राजीव शुक्ला यांची भेट घेऊन प्रतिभा सिंह आपली बाजू मांडत आहेत. (Latest Marathi News)

pratibha singh
Shivsena : शिंदे-ठाकरे गटाचे खासदार आमने-सामने, गृहमंत्र्यांच्या भेटीआधी कॅबिन बाहेर घडलं असं काही की....

हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांना खासदारपदावरून हटवून त्यांना मुख्यमंत्री बनवण्यास हायकमांड अनुकूल नसल्याची माहितीही सत्रांमधून मिळत आहे. मंडी जिल्ह्यातील विधानसभेच्या 10 पैकी नऊ जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत मंडी लोकसभा जागेची लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस हायकमांडला नको आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण?

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयामुळे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याच्या विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मुकेश अग्निहोत्री यांचाही या शर्यतीत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिभा सिंह यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही आणि आमदारही नसले तरी त्यांनी राज्यभर पक्षाचा प्रचार केला. ते सध्या मंडीचे खासदार आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी मतदान पार पडलं. यात काँग्रेसने सर्वाधिक 40 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर भाजपने 25 तर इतर 3 जागांवर आहे. हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com