Shivsena : शिंदे-ठाकरे गटाचे खासदार आमने-सामने, गृहमंत्र्यांच्या भेटीआधी कॅबिन बाहेर घडलं असं काही की....

अमित शाह यांची भेट घेण्यासाठी शिंदे गटातील दोन खासदार देखील तिथे आले होते.
Shivsena MP
Shivsena MPSaam TV
Published On

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य याप्रकरणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार आमने-सामने आले. (Maharashtra News)

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांवरुन संसदेच्या दालनातच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायलं मिळालं. घडलं असं की, अमित शाह यांची भेट घेण्यासाठी शिंदे गटातील दोन खासदार देखील तिथे आले होते.

त्यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी शिंदे गटाचे दोन खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना अमित शाहा यांच्यासोबतच्या बैठकीला नेण्याचा प्रयत्न केला.

Shivsena MP
Maharashtra Politics: अमित शाह ॲक्शन मोडमध्ये! राज्यपालांचे वक्तव्य आणि सीमाप्रश्नाबाबत घेणार मोठा निर्णय

मात्र ठाकरे गटाने विरोध केल्यानंतर दोन खासदार अमित शाहा यांच्या केबिन बाहेरच थांबले. त्यामुळे काही वेळ दोन खासदारांच्या एन्ट्रीमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Shivsena MP
Shraddha Walker Case: धर्म जागृती झाली पाहीजे, १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर विचार व्हावा; श्रद्धाचे वडील काय म्हणाले?

अमित शाह अॅक्शन मोडमध्ये

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून वारंवार करण्यात येणारी वादग्रस्त वक्तव्ये आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत गृहमंत्री शाह मोठा निर्णय घेणार आहेत. आज महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी "दोन्ही प्रश्नांबाबत मला जिथे सांगायचं तिथं मी सांगितलं आहे" असं म्हणत महाराष्ट्रातल्या खासदारांना अमित शाह यांनी आश्वासन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com