Visitors enjoy authentic Koli seafood and cultural performances at the Versova Koli Food Festival 2026 in Mumbai. Saam Tv
मुंबई/पुणे

वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ला उद्यापासून सुरुवात, कोळी खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव

Versova Koli Food Festival 2026: वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ मध्ये कोळी समाजाची समृद्ध खाद्यसंस्कृती, पारंपरिक सीफूड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोकसंगीताचा अनुभव घ्या.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

कोळी समाजाच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा आणि परंपरेचा उत्सव साजरा करणारा वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ येत्या २३, २४ आणि २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव वर्सोवा कोळीवाडा, अंधेरी (पश्चिम) येथील गणेश मंदिर मैदान, चर्च रोड येथे पार पडणार आहे.

या तीन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये मुंबईकरांना तसेच पर्यटकांना कोळी समाजाच्या पारंपरिक जीवनशैलीचा आणि खास खाद्यपदार्थांचा अनुभव घेता येणार आहे. उत्सवात ताज्या समुद्री माशांचे, कोळंबी, खेकडे यांसह विविध प्रकारच्या सीफूड पदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. पारंपरिक कोळी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

फूड फेस्टिव्हलमध्ये केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर कोळी महिलांची पारंपरिक वेशभूषा, सोनेरी दागिने, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्य आणि थेट संगीत यांची रंगत पाहायला मिळणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केळीच्या पानांवर जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हा फेस्टिव्हल वेसावा कोळी जमात पब्लिक रिलिजस अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, कोळी समाजाची परंपरा, संस्कृती आणि खाद्यवैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. कोळी संस्कृतीचा अनुभव, चवदार सीफूड आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा उत्सव मुंबईकरांसाठी खास आकर्षण ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुतोंडी कृती, एमआयएमसोबत युती? भाजपचा एमआयएमसोबत घरोबा?

Municipal Corporations: राज्यातील १५ महापालिकांमध्ये महिलाराज, कोणत्या महापालिकांमध्ये असतील महिला महापौर?

ठाकरेंची युती धोक्यात? मनसे शिंदेंसोबत गेल्यानं ठाकरे भाजपसोबत?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT