vba leader prakash ambedkar slams to deputy cm devendra fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Politics : "बिचारे देवेंद्र फडणवीस" उपमुख्यमंत्रिपदावरुन प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Prakash Ambedkar Latest News : मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने फडणवीस नाराज आहेत अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

गोपाल मोटघरे

मुंबई: काल, गुरुवारी राज्याच्या राजकारणाने ३६० डिग्री यू-टर्न घेतला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कालच्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने फडणवीस नाराज आहेत अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे. (Prakash Ambedkar On Devendra Fadnavis)

हे देखील पाहा -

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खोचक ट्विट केलं होतं. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलं होतं की, " बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला ! असा खोचक टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे. तसेच "चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का?" असा खोचक सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, बिचारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते उपमुख्यमंत्री झाले म्हणून असं ट्विट मी केलं आहे. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का हे केंद्रात विचारायला हवं. सरकार वर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पण होते ना. ११ तारखेला पीटिशन सेनेकडे गेलं तर आपली नामुष्की होऊ नये म्हणून फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री पद दिलं असावं.

शिवसेना उद्धव ठाकरेंचीच! - प्रकाश आंबेडकर

शिवसेनेतल्या बंडखोरीबद्दलही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाच आहे हे मान्य करावा लागेल. वेगळा गट जो झाला आहे ते ही आज शिवसेना आमची आहे असं म्हणत आहेत. जो व्हीप काढण्यात आला होता त्याचं उल्लंघन करण्यात आलं. माझ्या मते ते पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये बसत आहे असं वाटतं. ११ जुलैला विश्वासदर्शक ठराव होईल असं वाटतं. गटनेत्याला कुठलाही अधिकार नसतो. राज्यपालांना ज्या वेळी वाटतं की या सरकारला बहुमत नाही तेव्हा ते विरोधी पक्षाला विचारू शकतात त्यामुळे हे चुकीचे वाटत नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नाराज?

भाजपमध्ये सगळं आलेबल आहे असं दिसत असलं तरी महाराष्ट्र भाजपमध्ये अस्वस्थता आहे. महाराष्ट्र भाजपचा चेहरा असलेल्या फडणवीसांना डावललं गेल्याने भाजप आमदार आणि फडणवीस समर्थक नाराज आहेत. केंद्राने फडणवीसांच्या खच्चीकरणासाठी असं केलं का? असा सवाल भाजप कार्यकर्ते दबक्या आवाजात विचारत असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावर बसून मविआ सरकारच्या नाकी नऊ आणले. मविआ सरकारला त्यांनी नेहमीच धारेवर धरलं. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असताना उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला सांगून भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाने फडणवीसांची ताकद कमी करत मोठी रिस्क घेतल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. फडणवीस यांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊनही त्यांनी ट्विटरवर आपलं बायो हे 'महाराष्ट्र सेवक' असं ठेवलं आहे. त्यांनी 'उप-मुख्यमंत्री' असं ठेवणं अपेक्षित आहे. त्यामुळे फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांणा अधिक उधाण आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा एल्गार; काय आहे येवल्यातील मतांचं गणित? पाहा व्हिडिओ

Priyanka Gandhi : PM मोदींचं चॅलेंज प्रियंका गांधींनी स्वीकारलं; शिर्डीतील सभेत नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

SCROLL FOR NEXT