Maharashtra Political Crisis : हा फक्त ट्रेलर पिक्चर अजून बाकी; भाजप नेत्याचं विधान, पुन्हा नवा ट्विस्ट?

फडणवीस यांचा मेगा शो आपण येणाऱ्या काळामध्ये बघाल, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis, Ashish Shelar, Eknath Shinde, BJP Latest News
Devendra Fadnavis, Ashish Shelar, Eknath Shinde, BJP Latest NewsSaam Tv
Published On

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असताना देखील त्यांनी उपमुख्यमंत्रपद का घेतलं? वरिष्ठांच्या आदेशानंतरच फडणीसांना हा निर्णय घेणं भाग पडलं का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच, भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कधीच पद मागितलं नव्हतं असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. (BJP Ashish Shelar Latest News)

Devendra Fadnavis, Ashish Shelar, Eknath Shinde, BJP Latest News
Eknath Shinde | …तोपर्यंतच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील; संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा...

2014 साली सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पद मागितलं नव्हतं असंही आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर, हा फक्त ट्रेलर आहे अजून देवेंद्र फडणीस यांचा अजून मोठा चित्रपट येणार आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. दरम्यान शेलार यांच्या विधानाने नेमका फडणवीस यांचा चित्रपट कसा असेल? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Eknath Shinde Latest News)

काय म्हणाले आशिष शेलार?

"2014 साली जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी सुद्धा त्यांनी पद मागितलं नव्हतं. अन्य पक्षामध्ये जशी रस्सीखेच तसेच लॉबिंग देवेंद्र फडणवीस यांनी कधीच केली नाही. त्या काळात सुद्धा पक्षातील अन्य नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. भाजपची ही प्रथा आणि परांपरा राहिली आहे. मला असं वाटतं हा ट्रेलर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बिंग पिक्चर मोठा पिक्चर अजून येणं बाकी आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मेगा शो आपण येणाऱ्या काळामध्ये बघाल". असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. (Devendra Fadnavis News)

Devendra Fadnavis, Ashish Shelar, Eknath Shinde, BJP Latest News
Sharad Pawar : नवं सरकार सत्तेत येताच शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस

गुरूवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं. याशिवाय आपण सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. दरम्यान, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, जे.पी. नड्डा यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं अशी विनंती केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

दरम्यान, यावर बोलताना शेलार म्हणाले की, "मला सांगा देशातील कुठल्या मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्याला पदावर विराजमान होण्यासाठी एवढ्या मोठ्या नेत्यांनी सार्वजनिक निवेदन केलं. देवेंद्रजींच्या बाबतीत केलेलं निवेदन हा गैरसमजाचा भाग नसून अभिमानाचा भाग आहे. मला असं वाटतं की येणारा काळात देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व अजून मोठं झालेलं आपल्याला दिसेल". असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com