Crime News 
मुंबई/पुणे

पाेलिस लिहिलेल्या वाहनातून उतरत हायवेवरच चढविला त्यांनी हल्ला

चेतन इंगळे

वसई : डाव्याबाजूने जाणाऱ्या एका वाहनाला कट बसल्याचा राग मनात धरून त्या वाहनातील तिघांनी मुंबई - अहमदाबाद महामार्गावर एक वाहन चालकास मारहाण करुन त्यास शिवीगाळ केल्याची घटना रविवार घडली. मारहाण करण्यासाठी ज्या वाहनातून तिघे उतरले हाेते त्या वाहनाच्या पुढे पाेलिस अशी पाटी हाेती असे हल्ला झालेल्या चालकाने ट्विट केले आहे. या घटनेची नाेंद पाेलिसांत झाली आहे. (vasai-youth-hit-car-baseball-stick-mumbai-gujarat-highway-the-car-had-a-police-board-in-front-sml80)

दरम्यान संबंधित घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली Crime News.

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर तीन अनोळखी इसमांनी एक कार चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास वसईच्या सतीवलीखिंड अहमदाबाद या मार्गावरील लेनवर हर्षद पांचाळ ही व्यक्ती आपल्या वाहनातून अहमदाबादच्या दिशेने चालली हाेती. त्यांच्या डाव्याबाजूने जाणाऱ्या एका वाहनाला कट बसल्याचा राग मनात धरून त्या वाहनातील तिघांनी हर्षद यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर त्या वाहनातील एकाने वाहनातून उतरुन बेसबाॅलच्या बॅटने हर्षद यांच्या वाहनाच्या समाेरील बाजूच्या काचेवर जाेरदार मारली. यावेळी संबंधित इसमाने वाहनावर लाथा देखील मारल्याचे हर्षद यांनी नमूद केले. हर्षद पांचळ हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, पायाला दुखापत झाली आहे. वालीव पोलिस ठाण्यात हर्षद यांनी तक्रार नाेंदविली आहे.

या तक्रारीत त्यांनी वाहन क्रमांक एम.एच.43 बी.यु 0068 या वाहनातील तीन अनोळखी व्यक्तींनी त्रास दिल्याचे म्हटले आहे. या तिन्ही अनाेळखी व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वालीव पोलिस घटनेचा सखोल तपस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

SCROLL FOR NEXT