Anilkumar Pawar  sakal
मुंबई/पुणे

सर्वात मोठी बातमी! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

Anilkumar Pawar : वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीने अटक केली आहे. अनिलकुमार पवार यांच्याव्यतिरिक्त वाय एस रेड्डी यांनाही अटक करण्यात आले आहे.

Yash Shirke

  • मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीची मोठी कारवाई

  • वसई-विरार पालिका माजी आयुक्त ईडीकडून अटक

  • माजी आयुक्त अनिलकुमार पवार ईडीच्या ताब्यात

  • नगररचना विभागाचे माजी उपसंचालकही ताब्यात

मनोज तांबे, साम टीव्ही, प्रतिनिधी

वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीने अटक केली आहे. यासोबत ईडीने महापालिकेचे निलंबित नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांनाही ताब्यात घेतले आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि बेनामी संपत्ती सापडल्याच्या पुराव्यांमुळे अनिलकुमार पवार यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यांची चौकशी देखील झाली होती.

अनिलकुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी २९ जुलै २०२५ रोजी ईडीने धाड टाकली होती. मुंबई, पुणे, नाशिक, सटाणा अशा एकूण १२ ठिकाणी ईडीने छापा मारला होता. पवार यांच्या निवासस्थानावरुन १ कोटी ३३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. सोबतच मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, हार्डडिस्क, नातेवाईक आणि बेनामी व्यक्तींच्या नावावर असलेली प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स, कॅश-चेक स्लिप्स आणि डिजिटल उपकरणे ईडीने ताब्यात घेतली होती. अनधिकृत बांधकामात पवार प्रति चौरस फुट २० ते २५ रुपये आकारात होते असा गंभीर खुलासा ईडीने केला होता.

नेमकं प्रकरण काय?

वसई विरारमधील ४१ बेकायदेशीर इमारतीच्या बांधकाम प्रकरणांमध्ये अनिलकुमार पवार यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप झाला होता. शहरातील अनधिकृत बांधकाम प्रकल्पांना अनिलकुमार पवार यांचा पाठिंबा असल्याचा संशय ईडीला होता. यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप देखील करण्यात आले होते.

नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगरमध्ये कचरा डेपो आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृतपणे इमारती बांधण्यात आल्याचे उघड झाले होते. बोगस कागदपत्रे बनवून सदनिका सर्वसामान्यांना विकण्यात आल्या. लोकांची फसवणूक करण्यात आली. या घोटाळ्यामुळे तब्बस अडीच हजार कुटुंब बेघर झाली होती. या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात अनिलकुमार पवार सर्वात मोठे लाभार्थी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT