Vasai Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Vasai Crime News: वसईत एटीएम मशीन लुटण्याचा प्रयत्न फसला; अलार्म वाजला अन्... घटना CCTVत कैद

Vasai ATM Robbery: याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

चेतन इंगळे

Vasai Virar Crime News: गेल्या काही दिवसांपासून वसई विरार परिसरात एटीएम लुटण्याच्या घटना समोर येत आहेत. वसईमध्ये पुन्हा एकदा एटीएम केंद्र लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

वसई पश्चिमेच्या बाभोळा येथे हा प्रकार उघडकीस आला. परिसरातील एसबीआय बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न मध्यरात्री झाला. मात्र यंत्र फोडता न आल्याने चोरांनी पळ काढला. या चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, वसई पश्चिमेला (Vasai East) बाभोळा येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम केंद्र आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरांच्या एक टोळीने या एटीएम केंद्रात शिरून यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना एटीएम यंत्र फोडता आले नाही.

एटीएम केंद्रांमध्ये असलेल्या सुरक्षा यंत्रणेतून धोक्याची सूचना देणारा अलार्म वाजला. त्यामुळे चोर सावध झाले आणि त्यांनी तिथून पळ काढला. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. आम्हाला बँकेने उशिरा कळवले होते. आरोपी वाहनांतून आले होते. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास करत असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली. आरोपींच्या शोधासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT