Vasai Municipal Commissioner car attacked  SAAM TV
मुंबई/पुणे

Vasai News : वसई-विरार महापालिका आयुक्तांच्या कारवर हल्ला, धक्कादायक घटना

Vasai Crime News : वसई-विरार महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या कारवर आज, शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका आंदोलनकर्त्यानं हल्ला केला.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Vasai Crime News : वसई-विरार महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या कारवर आज, शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका आंदोलनकर्त्यानं हल्ला केला. दगडानं कारच्या काचा फोडल्या. पोलिसांनी या आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतले आहे.

वसई-विरार महापालिका मुख्यालयाच्या इमारतीखाली आयुक्तांची कार उभी होती. या ठिकाणी दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या एका आंदोलकानं या कारवर हल्ला केला. कारच्या काचेवर दगड फेकला. आरोपीनं रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, अनधिकृत बांधकामाविरोधात एक व्यक्ती वसई-विरार महापालिका मुख्यालयाच्या समोर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहे. मात्र, आपल्या आंदोलनाला पालिका आयुक्तांकडून कोणतेही उत्तर देत नसल्याने त्याला राग आला.

रागाच्या भरात या व्यक्तीने मुख्यालयाच्या इमारतीखाली उभ्या असलेल्या आयुक्तांच्या कारच्या काचा दगडाने फोडल्या आहेत. पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला विरार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT