- तबरेज शेख
Nashik Crime News : पैशाच्या झालेल्या वादातून नाशिकच्या इंदिरानगर बोगदा परिसरात गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तीन संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार आणि गुन्हा दाखल केलेला संशयित मित्र असल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. (Maharashtra News)
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी अविनाश टिळे याने त्याचा मित्र सुनील चोरमारे याला काही दिवसांपूर्वी दाेन लाख रुपये उसने दिले होते. त्यांनतर 31 डिसेंबरला टिळे याने सुनीलकडून तीन दिवसांसाठी त्याच्याकडील चार चाकी वापरण्यासाठी घेतली होती.
त्यांनतर काही कारणात्सव अविनाश टिळे याला कार सुनीलला देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे गुरुवारी पावणे बाराला अविनाश हा त्याच्या चौघा मित्रांसोबत सुनील चोरमारे याला कार देण्यासाठी (nashik) इंदिरानगर बोगदा परिसरात आला होता. त्यावेळी संशयित सुनील चोरमारे , जगगु सांगळे, राज जोशी हे त्या ठिकाणी आले.
सुनील याने त्याच्या खिशातून देशी बनावटीच्या पिस्तूल मधून हवेत गोळीबार केला आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत अविनाशच्या दिशेने पुन्हा गोळीबार करण्यासाठी बंदूक ताणली. बंदुकीतून गोळी फायर झाली नाही. यावेळी घाबरलेल्या अविनाश आणि त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढत पोलिसांत धाव घेतली. (Breaking Marathi News)
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. संशयित सुनील चोरमारे, जगगु सांगळे, राज जोशी यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तिन्ही संशयितांचा मुंबई नाका पोलीस शोध घेताहेत अशी माहिती चंद्रकांत आहेर (पोलिस निरीक्षक) यांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.