Vasai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Vasai News: आश्रम शाळेतील विद्यार्थ्याला अधिक्षकाकडून बेदम मारहाण; मुलाची बरगडी तुटली, सामाजिक संघटना संतप्त

Vasai News: धक्कादायक घटनेनंतर आदिवासी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त करत संबंधितांच्या अटकेची मागणी केली आहे

चेतन इंगळे

Vasai News: आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अधिक्षकाकडून बेदम मारहाण केल्याची घटना धक्कादायक घटना वसईमध्ये घडली आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याला जबर मार लागला आहे. या धक्कादायक घटनेनंतर आदिवासी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त करत संबंधितांच्या अटकेची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आश्रम शाळेतील एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटनासमोर आली आहे. वसई मधील कामण येथील अण्णासाहेब धामणे या अनुदानित आश्रम शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला.

नितीन धनजी मागी (वय १४) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील रामपुर (वरठापाडा ) येथील रहिवाशी आहे. तर, पृथ्वी बोरसे असे मारहाण करणाऱ्या अधिक्षकाचे नाव आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मारहाण केल्यानंतर मुलाला गुपचूप घरी सोडण्यात आले. मारहाणीनंतर तो सात दिवस उपचाराविनाच असल्याचेही सांगण्यात येत आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अधिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने निलंबित करण्याची मागणी होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

SCROLL FOR NEXT