Nagpur News: दुध विक्रेत्यांना दणका... नागपुरात दुध भेसळ करणाऱ्या ९ जणांवर कारवाई; २२५० लिटर दूध केले नष्ट

Nagpur latest News: नागपूर जिल्ह्यात भेसळ करणाऱ्या 9 जणांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
 Nagpur latest News
Nagpur latest NewsSaamtv

Nagpur News: सणासुदीच्या काळात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करत नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशी भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात राज्य सरकारनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. नागपूर जिल्ह्यात भेसळ करणाऱ्या 9 जणांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

 Nagpur latest News
Maharashtra Politics: चंद्रकांत पाटलांना हटवा अन् अजितदादांना अध्यक्ष करा; मराठा आरक्षणाच्या बैठकीत नेत्यांचा सूर

याबाबत सविस्तर अशी की, सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाची प्रत्येक जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्यांवर धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे.

याच तपासणीदरम्यान नागपूर (Nagpur) जिल्ह्यात वेगवेगळ्या 9 डेअरींमध्ये भेसळयुक्त दूध आणि मिठाईची विक्री होत असल्याचे आढळून आली. या नऊ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून रामटेक (Ramtek) तालुक्यात 2250 लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले आहे. तसेच काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

या धडक कारवाईने दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून तपासणी मोहिमेत कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, तपासणी करताना काहीही गैरप्रकार आढळल्यास कायदा २००६ व नियमन २०११ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भेसळ आढळल्यास जनतेने समितीकडे तक्रार करावी, असे आवाहनही समिती सदस्यांकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

 Nagpur latest News
Maharashtra All Party Meeting: मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्यावर एकमत; OBCतून आरक्षण देण्यासंदर्भात विचार नाही!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com