Bhaskar Jadhav: वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा; भास्कर जाधव यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला

Bhaskar Jadhav vs Chandrasekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा भास्कर जाधव यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
भास्कर जाधव यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला
भास्कर जाधव यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोलाSaam TV

Bhaskar Jadhav vs Chandrasekhar Bawankule: उद्धव ठाकरे यांना यापुढे ‘घरकोंबडा’ म्हणाव लागेल. कारण, त्यांनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला आहे. ‘होऊ द्या चर्चा’ या उपक्रमाअंर्तगत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला.

भास्कर जाधव यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला
Maharashtra Politics: अजित पवारांकडून थेट फडणवीसांच्या खात्यात हस्तक्षेप; महायुतीत पुन्हा धुसफूस, नेमकं काय घडलं?

काय म्हणाले भास्कर जाधव?

चंद्रशेखर बावनकुळे नेहमी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात. कधी घरकोंबडा तर आणखी काही म्हणतात. वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? तुम्हाला आणि फडणवीसांना काही बोलायचं नाही. आमच्या पक्षप्रमुखांवर तुम्ही वाटेल ते बोलणार का? हे चालणार नाही, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.

इतकंच नाही, तर वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम लावावा, असा शब्दांत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी बावनकुळे यांना टोलाही लगावला आहे. दरम्यान, भास्कर जाधव यांच्या टीकेवरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार राम सातपुते यांचं भास्कर जाधव यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

भास्कर जाधव यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला
Weather Alert: महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत पुन्हा पाऊस बरसणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, वाचा IMD अंदाज

भास्कर जाधव यांच्या टीकेमुळे भाजप आक्रमक

उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत उरलेल्या लोकांचंही मानसिक संतुलन ढासळत चाललं आहे. भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांच्या रंगरुपावरून टीका केली आहे. भास्कर जाधव यांच्या वृत्तीचा मी निषेध करतो, उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची ओबीसींकडे बघण्याची नीच वृत्ती दिसत आहे. आजही भास्कर जाधव ओबीसींना अस्पृश्य मानतात का? हा माझा सवाल आहे. असं म्हणत राम सातपुते यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली.

बावनकुळे साहेब यांच्या रंगरुपावर टिप्पणी करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे तुमच्या आणि उद्धव ठाकरेंच्या तोंडाचा रंग उडाला आहे आणि यापुढे तुम्ही ओबीसी आणि मागास समाजाच्या रंगरुपावरून टीका केली तर समस्त ओबीसी आणि मागासवर्गीय समाज निवडणुकीत तुम्हाला बेरंग केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राम सातपुते यांनी दिला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com