वसई : भाईंदर रेल्वे स्टेशन शेजारील रेल्वे ट्रॅकवर हरिश मेहना (६०) आणि त्यांचा मुलगा जय (३०) या दोघांनी रेल्वे रुळावर झोकून जीवन संवपलं होतं. या दोन्ही बाप-लेकाच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. या दोन्ही पिता-पुत्राच्या आत्महत्येचं गुढ अखेर उलगडलं आहे. दोघांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आत्महत्या केली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील तणावात होते. त्यांच्या मुलाने कोणाला माहिती न होता आंतरधर्मीय विवाह केला होता. आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर दोन्ही बाप-लेकाला बदनाम होण्याची भीती सतावत होती. जयची पहिली पत्नी त्याला बदनाम करत असल्याची धमकी देत होती. या भीतीतून जय मेहताने टोकाचं पाऊल उचलले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जय मेहताने काही महिन्यांपूर्वी एका दक्षिण भारतीय मुलीशी देखील विवाह केला होता. तर गेल्या १० वर्षांपासून एका इतर धर्मीय मुलीसोबत विवाह बंधनात होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईमधील जय मेहताने पहिला विवाह हा कुटुंब आणि समाजाच्या नाकारण्याच्या भीतीमुळे लपवला होता. जयच्या पहिल्या पत्नीला त्याच्या दुसऱ्या पत्नीची माहिती कळाली. त्यानंतर तिने दुसऱ्या पत्नीला सोडण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही पहिल्या पत्नीबद्दल कळाल्यानंतर दोघांमध्ये वाद आणि तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या जयच्या मरोळ येथील कार्यालयात एक डायरी सापडली. त्यात त्याने दोन्ही पत्नींसाठी माफीनामा लिहिला होता.
या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी पोलिसांनी जयच्या मोबाईलचा कॉल तपशील आणि दोन्ही पत्नींच्या जबाबाचं विश्लेषण केलं. त्यावेळी पोलिसांना जयचे पहिल्या पत्नीसोबतचे मेसेज आणि चॅट सापडले. या चॅटमध्ये पहिल्या पत्नीने धमकी दिल्याचे उघड झाले आहे. तिच्याशी संबंध सोडल्यानंतर जयने २०२३ साली दुसऱ्या महिलेशी विवाह केला होता.
पोलिसांनी केलेल्या या प्रकरणाच्या चौकशीत जय आणि त्याच्या वडिलांनी समाजात मुलाच्या दोन विवाहाची माहिती मिळाल्यास बदनामी होईल. यामुळे सामाजिक नाकरण्याचा आणि अपमानाला सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यांना होती. यामुळे त्यांनी जीवन संपवण्याचा कठोर निर्णय घेतला, असे पोलीस चौकशीत उघड झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.