Vasai School Case : वसईतील शाळेत ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Crime NewsSaam Tv

Vasai School Case : वसईतील शाळेत ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Vasai School Crime News : नायगाव येथील एका शाळेत ७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. शाळेच्या कॅन्टींगमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुलानेच चिमुकलीवर अत्याचार केला.
Published on

बदलापूर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. हे प्रकरण ताजे असतानाच आता वसईतही अशाच प्रकारची संतापजनक घटना घडली. नायगाव येथील एका शाळेत ७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. शाळेच्या कॅन्टींगमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुलानेच चिमुकलीवर अत्याचार केला.

Vasai School Case : वसईतील शाळेत ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Badlapur News : बदलापूर घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; चामटोली गावातून २१ वर्षीय तरुणीला अटक

याप्रकरणी पोलिसांनी (Police) १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला रिमांड होममध्ये पाठवले आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दुसरीत असून ती शाळेच्या कॅन्टींगमध्ये जायला तयार नव्हती. कॅन्टीनमध्ये काम करणारा दादा मला त्रास देतो, असं पीडितेने मुख्याद्यापिकेला सांगितलं.

मुख्याद्यापिकेने तातडीने हा प्रकार शाळेतील इतर शिक्षकांना सांगितला. त्यांनी चिमुकलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता, कॅन्टींगमध्ये काम करणाऱ्या दादाने माझ्यासोबत ४-५ वेळा घाणेरडे कृत्य (Crime News) केल्याचे पीडितेने सांगितले. घडलेला प्रकार लक्षात येताच शिक्षकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने शाळेत धाव घेत १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे एकदा मुलीने आपल्या घरी देखील या प्रकाराची माहिती सांगितली होती. पण तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलं.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला अल्पवयीन आरोपी हा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचं कळतंय. दोनच महिन्यांपूर्वी तो काम करण्यासाठी वसईत आला होता. सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपीने आणखी कुणासोबत असे कृत्य केले आहे का? याचा तपास केला जात आहे.

Vasai School Case : वसईतील शाळेत ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Mumbai Crime News: मुंबई पुन्हा हादरली, धार्मिक शिक्षण संस्थेत १३ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com