Bhayandar News : लोकलच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू; भाईंदर रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना

Bhayandar Railway Station : भाईंदर स्थानकात रेल्वेखाली येऊन पिता-पुत्राने आत्महत्या केल्यामुळे धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारासची भाईंदर प्लेटफॉर्म क्रमांक ६ वर ही घटना घडली.
Bhayandar News
Bhayandar NewsSaam Digital

भाईंदर स्थानकात एका प्लेटफॉर्मवरून दुसऱ्या रेल्वे स्थानकावर जाताना पिता पुत्राला लोकलच धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारासची भाईंदर प्लेटफॉर्म क्रमांक ६ वर घडली घटना घडली आहे. मृत पिता पुत्र वसईतील रहिवासी असून हरिश मेहता (वय ६०), मुलगा जय मेहता (वय ३५) अंदाजे असल्याची प्राथमिक माहित आहे. पोलिसांना मात्र आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Bhayandar News
Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; मिहिर शहाने मद्यपान केलेल्या त्या बारला ठोकले टाळे, दारूचं बील १८००० रुपये

रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. मात्र पिता पुत्रांनी आत्महत्या का केली यांचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. वसई रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुार, सोमवारी मेहता पिता-पुत्र सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकात आले होते. फलाट क्रमांक ६ वरून ते मीरा रोडच्या दिशेने रेल्वे रुळांवरून चालत गेले. काही अंतरावरच लोकलने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये ते उतरून चालत जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यांनी आत्महत्या का केली त्याचा आम्ही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Bhayandar News
Panvel Fake Red Chili Sos : पनवेलमध्ये 'डर्टी' रेड चिली अन् सोया सॉस; मनसेने धाड टाकून केला भंडाफोड, पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com