Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar vs Sharad Pawar : राज्यातल्या सगळ्यात चुरशीच्या लढतीत बारामती आहे. काका विरुद्ध पुतण्याची ही लढत आता भावनिक मुद्यावर येऊन पोहचली आहे. 'मी साहेबांना सोडलेलं नाही', असं मोठं अजित पवारांनी मतदारांसमोर केलंय. पाहूया बारामतीमधल्या राजकारणावरचा एक रिपोर्ट...
Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit PawarSaam Tv
Published On

मुंबई : साऱ्या राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघांमध्ये दररोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काका आणि पुतण्याच्या रोज नवनवीन विधानांनी ही निवडणूक गाजतेय. काका अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार यांच्यामधील या लढतीमुळे पवार कुटुंबातला राजकीय संघर्ष शिगेला पोहचलाय.

लोकसभेला शरद पवारांनी घातलेली भावनिक साद बारामतीकरांना भावली. त्यामुळे आता विधानसभेला अजित पवारांनीही वेगवेगळ्या माध्यमातून बारामतीकरांना भावनिक साद घलण्याचा सिलसिला सुरू ठेवलाय. आता तर थेट दादांनी साहेबांना सोडलेलं नसल्याचं मोठं विधान केलंय.

Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar News : उद्या मलाही तिकीट त्यांनीच दिलं म्हणतील, शरद पवारांची नाव न घेता अजित पवारांवर फटकेबाजी

केवळ विकास कामांना स्थगिती दिल्यामुळेच आपण सरकारमध्ये सामील झाल्याचा दादांचा दावा मात्र ताईंनी फेटाळून लावलाय. हातातल्या बांगड्यांना ईडी सीबीआयची भीती नाही असा टोला त्यांनी लगावलाय.

Sharad Pawar vs Ajit Pawar
Yugendra Pawar Vs Ajit Pawar : बारामतीमध्ये पवारांचे शक्तीप्रदर्शन, नातवासाठी शरद पवार मैदानात, काका-पुतणे भरणार अर्ज!

गेल्या काही दिवसांत अजित पवारांनी कोणती मोठी विधानं केली आहेत ते पाहुयात

मी शरद पवारांना सोडलेलं नाही, सर्व आमदारांचं मत होतं सरकारमध्ये जावं

काकींना आताच कसा नातवाचा पुळका आला?

हा पठ्ठ्याच तुमची कामं करणार, बारामतीत आपलं नाणं खणखणीत

शरद पवारांनंतर बारामतीचा वाली मीच

लोकसभेला गंमत केलीत आता गंमत करू नका

Sharad Pawar vs Ajit Pawar
Baramati News: प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं, पाहा VIDEO

शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर बारामतीत भावनिक राजकारणाचा महापूर आलाय. त्यामुळे आता काकांना शह देण्यासाठी अजितदादांनीही बारामतीच्या गावागावांमध्ये आपल्या पद्धतीनं भावनिक मुद्दे बाहेर काढलंय. त्यामुळे विधानसभेला बारामतीकर कुणाच्या भावनांना प्रतिसाद देणार याची उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com