Vasai Horror Little Girl Dies Saam Tv News
मुंबई/पुणे

Vasai: आईनं खिडकीजवळ बसवलं अन् ४ वर्षांची चिमुकली १२व्या मजल्यावरून पडली; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO समोर

Toddler Falls from High-Rise Building: वसई पूर्व नायगावमध्ये आईच्या क्षणिक दुर्लक्षामुळे ४ वर्षीय अन्विका प्रजापतीचा १२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू. सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद; परिसरात हळहळ.

Bhagyashree Kamble

लहान मुलांकडे थोडं दुर्लक्ष झालं की दुर्घटना घडण्याची बाब काही नवीन नाही. मात्र, आईच्या क्षणिक दुर्लक्षामुळे एका चिमुकलीचा १२ मजल्यावरून पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना वसई पूर्वेतील नायगाव भागात मंगळवारी घडली. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आई चिमुकलीला खिडकीजवळील बाकावर बसवताना दिसत आहे. त्यानंतर मुलीचा तोल जातो आणि ती थेट १२ मजल्यावरून थाली पडते. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अन्विका प्रजापती (वय वर्ष ४) असं मृत चिमुरडीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्व परिसरात नवकार फेज वन ही १४ मजल्यांची इमारत आहे. अन्विका प्रजापती आपल्या कुटुंबासोबत १२ व्या मजल्यावर राहत होती. घटनेच्या दिवशी ती घराबाहेर खेळत आली. खेळत असताना तिच्या आईनं तिला खिडकीजवळील चपलांच्या स्टँडवर बसवलं. मात्र, खिडकी उघडीच होती. नंतर आई दुसरीकडे गेली. तिचं लक्ष नव्हतं. काही क्षणात चिमुकलीचा तोल गेला आणि ती खेट खिडकीबाहेर १२ व्या मजल्यावरून पडली.

चिमुकली खाली पडल्याचं लक्षात येताच आई जोरात ओरडली. तिनं चिमुकलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हातातून ती निसटली आणि थेट खाली कोसळली. या घटनेनंतर इमारतीत एकच गोंधळ निर्माण झाला. नागरिकांनी तिला तातडीनं रूग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला. डॉक्टरांनी तपासून चिमुकलीला मृत घोषित केले आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. त्यातला क्षण मन हेलावून टाकणारा आहे. क्षणभरात घडलेली ही दुर्घटना पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. चिमुकली मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे प्रजापती कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या प्रकारामुळे इमारतीतील सुरक्षेच्या बाबतीत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT