डॉक्टरांचा अजब उपचार! मानसिक आजारावर विस्की अन् बिअरचा सल्ला
डॉक्टरांचा अजब उपचार! मानसिक आजारावर विस्की अन् बिअरचा सल्ला Saam TV
मुंबई/पुणे

डॉक्टरांचा अजब उपचार! मानसिक आजारावर विस्की अन् बिअरचा सल्ला

चेतन इंगळे

विरार मध्ये अमेरेकीची पदवी घेतलेल्या मानसउपचारतज्ञ डॉक्टरने एका रुग्णावर उपचार करण्यासाठी ५ विस्की आणि १० बिअर असा मद्याचा उपचार सांगितला. या उपचार काहीतरी गौडबंगाल असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावेळी या कुटुंबियांना डॉक्टर ने ९ लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्नाळा पोलिसांनी या डॉक्टरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अर्नाळा पोलिसांनी माहिती दिली की, हैद्राबाद येथे राहणारे किरण कुमार वंगला (४७) हे एका महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यांची मुलगी छीन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया) या आजाराने ग्रासली आहे. तिच्यावर हैद्राबाद येथे एका तज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत.

पण तिला आराम येत नव्हता. दरम्यान वंगला यांच्या पत्नी ने युट्यूब वर विरार येथील डॉ. कैलाश मंत्री याचे व्हिडीओ पहिले त्यात त्यांनी ऑनलाइन पद्धतीने हा आजार १० दिवसात बरे करण्याचा दावा केला होता. त्याच्या या प्रलोभनाला बळी पडत वंगला यांच्या पत्नीने मंत्री याच्याशी संपर्क साधला. यावेळी मंत्री यांनी उपचाराचे ५ लाख रुपये सांगितले आणि मुली बरोबर घरच्या मंडळीचा सुद्धा उपचार करवा लागेल असे त्याने सांगितले. सांगितल्या नुसार वंगला कुटूबियांनी मंत्री याला पैसे पाठविले आणि त्याने सांगितल्या पद्धतीने उपचार घेतले. पण वंगला यांच्या मुलीत कोणतीही सुधारणा झाली नाही. यावेळी त्यांनी पुन्हा मंत्री याच्याशी संपर्क साधला आणि मुलीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे सांगितले. यावेळी मंत्री याने त्यांना मुंबईला येवून भेटण्यास सांगितले.

मंत्री याने वंगला यांना विमानतळावर घेण्यासाठी गाडी पाठवली, यावेळी त्याने उपचारासाठी ५ विस्की आणि १० बिअर आणि ३ लाख रुपये घेवून येण्यासाठी सांगितले, वंगला यांनी पुन्हा पैसे आणि दारू दिली. जेव्हा ते डॉक्टर मंत्री याला विरार येथील बोळींज परिसरातील दवाखान्यात भेटले तेव्हा त्याने अजब उपचार सांगितले, त्याने सांगितले की तुमच्या मुलीला भरपूर दारू पाजा आणि तिला महिनाभर एका प्रियकराच्या जवळ ठेवा. वंगला यांना हे उपचार पटले नाही. आणि त्यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात डॉक्टरच्या विरोधात तक्रार नोंदविली.

अर्नाळा पोलिसांनी डॉक्टर कैलाश मंत्री याची चौकशी केली असता त्याने ऑनलाईन पद्धतीने अमेरिकेतील एका विद्यापीठातून मानसउपचार तज्ञाची पदवी घेल्याचे आढळून आले. ही पदवी बनावट असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे याच्या पदवीची तपासणी पोलीस करत आहेत. सध्या त्याच्या विरोधात ९ लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tabu : उतरत्या वयातही तबूच्या सौंदर्याची जादू

Nashik Land Scam: नाशकात भूखंडाचं श्रीखंड कोणी खाल्लं? 800 कोटींचा घोटाळा, राऊतांचा थेट मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात अखिल भारतीय सेनेचा महायुतीला जाहीर पाठिंबा

Divorce over Kurkure: कुरकुऱ्यांमुळं संसारात किरकिर वाढली; बायको रुसली, पोलीस ठाण्यात बसली, म्हणतेय घटस्फोट हवाय!

Rakhi Sawant Hospitalized: राखी सावंतची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT