varandha ghat closed for all types of vehicles till further notice
varandha ghat closed for all types of vehicles till further notice Saam Digital
मुंबई/पुणे

Varandha Ghat Road Closed : वरंधा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Siddharth Latkar

- सागर आव्हाड

Pune :

भोर महाड मार्गावरील वरंधा घाट एक तारखेपासून बंद असल्याची अधिसूचना जारी करूनही या मार्गावर वाहने ये जा करत आहेत. दुरुस्ती कामात अडथळे निर्माण होण्याच्या शक्यतेने रायगड प्रशासनाकडून भोर रायगड हद्दीच्या सीमेवर दगड मातीचे ढिगारे टाकून रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भोरकडून, कोकणाकडे व कोकणातून भोरकडे येण्यास घाट बंद झाला आहे. (Maharashtra News)

भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात अतिवृष्टीने २०१८ मध्ये झालेली पडझड, २०१९ दुरुस्ती, २०१९ ते २०२० व २१ काेरोना काळ तसेच २०२१ अतिवृष्टी, २०२२ मध्ये दरडी कोसळल्यामुळे व उंबर्डेवाडी येथे रस्ता खचल्याने, २०२३ मध्ये दरडी व सुरक्षतेसाठी तर २०२४ रस्ता दुरुस्ती, अशा कारणांमुळे सन २०१८ पासून गेली सात वर्षे प्रत्येक वर्षातील काही दिवस रस्ता बंद ठेवण्यात येत आहे. वरंधा (ता. महाड) हद्दीत बॅरिकेट व सूचना फलक रायगड पोलिसांकडून लावले आहेत.

वरंधा घाट मार्गास पर्यायी मार्ग म्हणून कोकणात जाण्यासाठी पुणे मुळशी पिरंगुट-ताम्हाणी घाट- निजामपूर रोड-माणगाव व पुणे-वाई-आंबेनळी घाटमार्गे पोलादपूर असा असणार असून वरंधा घाट सुरू होईपर्यंत या मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha: मोदींच्या सभेत घोषणा देणारा शेतकरी शरद पवारांच्या भेटीला! चर्चा काय?

Relationship Tips: योग्य जोडीदारामध्ये 'या' सवयी दिसतील

Nushrratt Bharuccha चं मानधन किती ?, महिन्याला कमावते लाखो...

Today's Marathi News Live : कागल तालुक्यातील आनूर येथील चौघांचा वेदगंगा नदीत बुडून मृत्यू

Patna Latest News : डॉक्टरच्या गैरहजेरीत चक्क कंपाऊडरने शस्त्रक्रिया केल्याचा आरोप; ६२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT