पुण्यातील येरवडा भागातील दोन दुकानांमध्ये चार अल्पवयीन मुलांकडून तोडफोड... Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यातील येरवडा भागातील दोन दुकानांमध्ये चार अल्पवयीन मुलांकडून तोडफोड...

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकान फोडतानाचा सर्व प्रकार झाला कैद

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : येरवडा जयप्रकाश नगर या ठिकाणी चार अल्पवयीन मुलांनी दोन दुकाने फोडली आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे. याबाबत माहिती अशी की जयप्रकाश नगर येथील किराणा दुकाने दहशत माजविण्याच्या दृष्टीने फोडण्यात आली आहेत. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही.

पहा व्हिडिओ-

येरवडा भागात दहशत माजविण्याच्या दृष्टीने असेच अनेक छोटे- मोठे प्रकार वारंवार घडत असतात. या घटनेमुळे परत एकदा येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे सीसीटीव्ही बघून किराणा दुकानदार दुकानात ग्राहकांना सामान देत असतानाच चार जण येऊन हॉकी स्टिकने दुकानातील सामान फोडतात.

यापूर्वीही असे अनेक प्रकार येरवडा परिसरामध्ये झाले आहेत .येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. अवैध धंदे आणि असले युवकांचे टोळके हे दहशत माजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत .पोलीस सर्वांना पाठीशी घालतात. दिवसाढवळ्या हे सर्व प्रकार सुरु असताना यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मात्र गप्प आहेत. दहशत माजवणाऱ्या विरोधात येरवडा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केली आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अनेक भाईलोक विरोधात मोक्का कारवाया केले असले, तरी नवीन उदायास येणाऱ्या भाई लोकांवरती काय कारवाई करतात आणि या ठिकाणच्या पोलीस निरीक्षकावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर असेच प्रकार होत राहिली तर नागरिकांचा विश्वास पोलिसांवर राहणार नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांना देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT