'हिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंचं शिवसेनेला ‘ओपन चॅलेंज’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे नेहमी एकमेंकांवर टीका टिप्पणी करत असताना दिसून येतात
'हिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंचं शिवसेनेला ‘ओपन चॅलेंज’
'हिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंचं शिवसेनेला ‘ओपन चॅलेंज’Saam Tv
Published On

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे Union Minister Narayan Rane आणि शिवसेना Shiv Sena यांच्यामधील वाद आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि नारायण राणे हे नेहमी एकमेंकांवर टीका टिप्पणी करत असताना दिसून येतात. चिपी विमानतळाच्या Chipi Airport उद्धघाटनाप्रसंगी दोघांची टोलेबाजी आपण बघितलीच आहे.

आता परत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' असे थेट आव्हान राणेंनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. राणेंनी यांनी आपल्या 'प्रहार' वर्तमानपत्रामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती चांगलाच निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना आपल्या मुखपत्र असलेल्या सामना मधून भाजपवर जोरदार टीका करत होती.

हे देखील पहा-

आता त्याचा बदला काढण्याकरिता राणेंनी देखील आपल्या प्रहार या वृत्तपत्रातून शिवसेनेवर जोरदार टीकाबाजी चालू केली आहे. आजच्या प्रहारमध्ये देखील 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' अशा मथळ्याखाली नारायण राणेंचा घणाघाती प्रहार आजच्या अंकात छापून आले आहे. प्रहार पेपरच्या पहिल्याच पानावर हा मथळा छापला गेला आहे. गुरुवारच्या प्रहार पेपरच्या अंकात 'हार आणि प्रहार' या शिर्षकाखाली नारायण राणे थेट उद्धव ठाकरेंना टिका केली आहे.

'प्रहार'च्या आजच्या अंकात विषयी सांगितले आहे की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांवर बेलगाम टीका करणाऱ्या, सत्तेच्या लोभाकरिता हिंदुत्वाची कास सोडलेल्या, ज्यांच्या मदतीने पक्ष वाढवला त्या भाजपवर बेछूट आरोप करणाऱ्या आणि केंद्र सरकारकडे कायम झोळी पसरवून त्यांनाच दोष देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खणखणीत प्रहार, 'हार आणि प्रहार', आजच्या अंकात लिहले आहे.

'हिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंचं शिवसेनेला ‘ओपन चॅलेंज’
शिर्डी-साईभक्त महिलांना अश्लील फोटो पाठवणाऱ्यावर कारवाई करा - शिवसेना महिला आघाडी

शिवसेनेचा दसरा मेळवा नुकताच पार पडला आहे. यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला होता. केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर वापर भाजप करत असल्याचे आरोप ठाकरे सरकारनी केला होता. चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंवर टीका केली होती.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, पाठांतर करुन बोलणे वेगळे असते, आत्मसात करुन बोलणे वेगळे असते, आणि तळमळीने बोलणे वेगळे व मळमळीने बोलणे वेगळे असा टोला त्यांनी लगावला होता. नजर लागू नये, म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही या ठिकाणी उपस्थित आहेत. पण कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत बसत नाही. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिले आहे. मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटे बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावले आहे, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका करण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com