Vaishnavi Hagawane Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: मला माझं सौभाग्याचं लेणं मिळालं..., वैष्णवीचा लग्नातील तो VIDEO पाहून सर्वजण हळहळले

Vaishnavi Hagawane Video: वैष्णवी हगवणेचा लग्नातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी इमोशनल झाले आहेत. लग्न झाल्यानंतर वैष्णवीच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद या व्हिडिओत दिसून येत आहे.

Priya More

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. हुंड्यासाठी सासरच्यांनी केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले होते. तिने १६ मे रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या नवऱ्यासह ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशामध्ये वैष्णवीचा लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वैष्णवी तिच्या सौभाग्याच्या लेण्याबद्दल बोलताना दिसत आहे.

वैष्णवीला लग्नासाठी ज्या मेकअप आर्टिस्टने तयार केले होते त्याने तिचा हा व्हिडीओ तयार केला होता. जो सध्या सोशल मीडियावर सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. 'माझी ब्राइड लग्नासाठी जाताना खूप सुंदर गेली होती आता आल्यानंतर ती अशी आहे.', असं मेकअप ऑर्टिस्ट या व्हिडीओमध्ये बोलताना दिसतो. त्यावर वैष्णवी म्हणते, 'मी अजून सुंदर झाली आहे. मला माझं मस्त सौभाग्याचं लेणं मिळालं आहे. खूप छान वाटत आहे. मेकअप काही हालला नाही. मी जशी गेली तशीच आली आहे.' या व्हिडीओमध्ये वैष्णवी खूपच सुंदर दिसत आहे. लग्नामध्ये शशांकने तिच्या भांगेमध्ये भरलेले कुंकू ती दाखवताना दिसते.

वैष्णवीच्या या व्हिडीओने सर्वांना इमोशनल करून टाकलं आहे. तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हासू हे स्पष्टपणे दिसत आहे. लग्नामध्ये वैष्णवी खूपच खूश होती. शशांक तिच्या गळ्यात हार घालताना वैष्णवी आनंदामध्ये रडताना दिसत असल्याचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता. वैष्णवी आणि शशांक यांचे लव्ह मॅरेज होते. २०२३ मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. मोठ्या धुमधडाक्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाची खूपच चर्चा झाली होती.v

महत्वाचे म्हणजे, वैष्णवीच्या लग्नात तिच्या वडिलांनी तिला ५१ तोळे सोनं, साडेसात किलोची चांदीची भांडी, आलिशान कार दिली होती. लग्नानंतर वैष्णवीच्या सासरची मंडळी हुंड्यासाठी तिचा छळ करू लागले. कधी तिला मारहाण, कधी शिवीगाळ ते करत होते. तिचा नवरा, सासू-सासरे, नणंद आणि दीर हे तिला मारहाण करत होते. माहेरून पैसे आणण्यासाठी ते तिच्या मागे लागायचे. वैष्णवीने आत्महत्या करण्यापूर्वी तिला मारहाण करण्यात आली होती. तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली. वैष्णवी प्रकरणात तिचा नवरा शशांक, सासू लता, सासरे राजेंद्र, नणंद करिश्मा आणि दीर सुशील यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र थंडीने गारठला, हु़डहु़डी कायम

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

SCROLL FOR NEXT