Thandai Recipe: रंगपंचमीला सकाळी बनवा टेस्टी थंडाई; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

थंडाई म्हणजे काय?

थंडाई हे उत्तर भारतातील पारंपरिक थंड पेय असून होळी, रंगपंचमीसारख्या सणांमध्ये विशेष बनवले जाते. सुका मेवा, मसाले आणि दूध यांचे मिश्रण यामध्ये असते.

Thandai Recipe | Saam Tv

साहित्य

1 लिटर थंड दूध, 8–10 बदाम, 8–10 काजू, 1 टेबलस्पून खरबूज बिया, 1 टीस्पून बडीशेप, 4–5 काळी मिरी, 4–5 वेलची, केशर (चिमूटभर), 4 टेबलस्पून साखर

Thandai Recipe | Saam Tv

मसाला तयार करण्याची पद्धत

बदाम, काजू, खरबूज बिया, बडीशेप, मिरी आणि वेलची 1–2 तास पाण्यात भिजवा. नंतर बारीक वाटून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

Thandai Recipe | Saam Tv

थंडाई बनवण्याची कृती

दुधात तयार पेस्ट, साखर आणि केशर घालून नीट ढवळा. मिश्रण गाळून 1–2 तास फ्रिजमध्ये थंड करा.

Thandai Recipe | Saam Tv

सर्व्ह करण्याची पद्धत

थंड झाल्यावर ग्लासमध्ये ओता. वरून चिरलेले बदाम-पिस्ते घालून सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

Thandai Recipe | Saam Tv

आरोग्यदायी फायदे

शरीराला थंडावा देतो, उर्जा वाढवतो, पचन सुधारण्यास मदत, सुका मेव्यामुळे पोषणमूल्य जास्त

Thandai Recipe | Saam Tv

काळजी

अतिसेवन टाळावे. मधुमेह असणाऱ्यांनी साखरेऐवजी गूळ किंवा शुगर-फ्री पर्याय वापरावा.

Thandai Recipe | Saam Tv

Cotton One Piece: पार्टीपासून ते रोजच्या वापरासाठी ट्राय करा ट्रेंडी आणि लेटेस्ट हे ७ कॉटन वन पीस

Cotton One Piece | Saam TV
येथे क्लिक करा