Vaishnavi Hagawane Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane : ५१ तोळे सोनं, आलिशान गाडी तरीही, छळ... राजकीय नेत्याकडून सुनेचा हुंडाबळी?

Vaishnavi Hagawane Case : अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या, वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. हुंड्यासाठी तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Yash Shirke

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने, वैष्णवी हगवणे हीने १६ मे रोजी गळफास घेत आत्महत्या केली. हुंडा देण्यावरुन होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात होता. पण वैष्णवीची हत्या झाल्याचे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात नवी अपडेट आली आहे. बीजे रुग्णालयाने वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला आहे. पण तिच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केल्याच्या अनेक जखमा देखील आढळून आल्या असल्याचे शवविच्छेजन अहवालामध्ये म्हटले आहे. वैष्णवीला हुंड्यावरुन तिच्या सासरचे लोक त्रास देत होते, तिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे असे वैष्णवीच्या वडिलांनी दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शशांक हगवणे (वैष्णवीचा पती), लता हगवणे (सासू) आणि करिष्मा हगवणे (नणंद) यांना अटक केली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहेत. वैष्णवीच्या नवऱ्याला हुंड्यात दिलेली आलिशान फॉर्च्यूनर कार पोलिसांनी जप्त केली आहे. हुंड्यात मिळालेल्या सोनं कुठे आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

वैष्णवीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये, वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. ५१ तोळे सोने, फॉर्च्युनरसारखी आलिशान गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून दिला होता. त्यानंतर हगवणे कुटुंबियांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली. वैष्णवीचा छळ करायला सुरुवात केली. वैष्णवी गर्भवती चारित्र्याचा संशय घेत मारहाण करत घराबाहेर काढले, असा उल्लेख आहे.

वैष्णवीने छळाला कंटाळून विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर उपचार करण्यात आले. शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे २ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने वैष्णवीला त्रास देण्यात आला. १६ मे रोजी वैष्णवीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. बेशुद्ध अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी वैष्णवीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, अशी माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT