Vaishnavi Hagawane Case Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: आमचं बाळ आमच्याकडे आलं याचा आनंद, वैष्णवीचा मुलगा आजी-आजोबांकडे सोपवला | VIDEO

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणेचे बाळ तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आले आहे. एका अज्ञात व्यक्तीने वैष्णवीचे बाळ वाकड हायवेजवळ तिच्या आई-वडिलांकडे दिलं. मुख्यमंत्र्यांनी बाळ कस्पटे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते.

Priya More

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वैष्णवीचे बाळ अखेर तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबीयांकडे देण्यात यावे असे आदेश दिले होते. त्यानंतर हे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांकडे देण्यात आले आहे. वैष्णवीची आत्महत्या झाल्यापासून तिचे बाळ कुठे आहे याची तिच्या आई-वडिलांना माहिती नव्हती. बाळाचा ताबा आपल्याकडे मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते अखेर हे बाळ त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

कस्पटे कुटुंबीयांनी सांगितले की, 'बाणेरच्या हायवेजवळ हे बाळ आमच्याकडे सोपवण्यात आले. एका अज्ञात व्यक्तीचा आम्हाला फोन आला होता. त्या व्यक्तीने बाळ आमच्या ताब्यात दिलं. आमचं बाळ आमच्याकडे आलं याचा आम्हाला आनंद आहे.' तसंच, 'हगवणेंना तात्काळ अटक करा. त्याच्याविरोधात कारवाई करा आणि त्यांना शिक्षा द्या.'

वैष्णवीचे बाळ तिच्या वडिलांकडे सोपवण्यात यावे असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या होत्या. राष्ट्रवादीच्या २ महिला नेत्यांना हे बाळ कस्पटे कुटुंबीयांकडे सोपवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. वैशाली नागवडे आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली होती.

वैष्णवीचं बाळ आधी त्याच्या आत्याकडे होतं. त्यानंतर ते बाळ निलेश चव्हाणकडे देण्यात आलं होतं. निलेशने ते बाळ अण्णा पवळे आणि अमित पवळे यांच्याकडे देण्यात आले. अण्णा पवले हे हगवणेंचे नातेवाईक आहेत. वैष्णवीचे बाळ ३ दिवस पवळे कुटुंबीयांकडे होते. आता हे बाळ आता वैष्णवीच्या आई-वडिलांकडे देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

SCROLL FOR NEXT