Vadodara-Mumbai Expressway X
मुंबई/पुणे

Vadodara-Mumbai Expressway : बदलापूर ते पनवेल प्रवास २० मिनिटांत करता येणार; बडोदा-जेएनपीटी मार्गाचं काम कुठपर्यंत आलंय?

अजय दुधाणे

Badlaur News:

सध्या महाराष्ट्रात बडोदा-जेएनपीटी या महामार्गाचे काम जलदगतीने सुरु आहे. आज बदलापुरातील बेंडशीळ गावाजवळ सुरु असलेल्या महामार्गातील महत्वपूर्ण बोगद्याच्या कामाची आमदार किसन कथोरे यांनी पाहणी केली. तब्बल साडेचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी जून २०२५ पर्यंत वाट पहावी लागेल. या महामार्गामुळे बदलापूर ते पनवेल प्रवास २० मिनिटांत करता येणार आहे. (Latest Marathi News)

बडोदा-जेएनपीटी हा महामार्ग बदलापूरमधून जात असल्याने भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि मुंबईची कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. बदलापूर ते पनवेल दरम्यान या महामार्गासाठी ४.१६ किलोमीटरचा बोगदा तयार करण्याच काम जलदगतीने सुरूआहे. त्यातील जवळपास ५० टक्के काम देखील पूर्ण झालं आहे.

महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरीपासून रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असणार आहे. महाराष्ट्रात १८९ किलोमीटर लांब आणि १२० मीटर रूंद असा महामार्ग असणार आहे.

बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचं काम बेंडशीळ गावाजवळ सुरू आहे. तब्बल साडेचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गही या महामार्गाला जोडलेले असतील. बेंडशील गावाजवळ सुरु असलेल्या या बोगद्याच्या कामाची पाहणी आज आमदार किसन कथोरे यांनी केली.

आमदार किसन कथोरे काय म्हणाले?

या महामार्गातील बोगद्याच्या कामाला गती मिळावी यासाठी पनवेल आणि बदलापूर अशा दोन्ही बाजूने बोगद्याचं काम सुरु आहे. महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली आहे.

प्रकल्प प्रमुख काय म्हणाले?

बडोडा-मुंबई महामार्गमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा या चार किलोमीटर बोगद्याचा आहे. त्याचे काम जलद गतीने सुरू आहे. बोगद्यासोबतच महामार्गाचे काम देखील बदलापूर शहरात प्रगतीपथावर सुरु आहे. या बोगद्याचं काम जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याच आमचं लक्ष असल्याची प्रतिक्रिया प्रकल्प प्रमुख सुहास चिटणीस यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IT Act Amendment: केंद्राच्या फॅक्ट चेक युनिटला झटका, IT कायद्यातील दुरुस्ती असंवैधानिक, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

SCROLL FOR NEXT