ST Electric Bus: ठाणे ते नाशिक फक्त ३४० रुपयांमध्ये, एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार ५१५० वातानुकूलित ई-बसेस

MSRTC Electric Bus: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या ई-बसेसचे लोकार्पण होणार आहे.
MSRTC Electric Bus
MSRTC Electric BusSaam tv
Published On

ST Electric Bus:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या ई-बसेसचे लोकार्पण होणार आहे. १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी दुपारी ३ वाजता ठाणे येथील खोपट बसस्थानकावरून हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यातच एसटी महामंडळात उद्या ५१५० वातानुकूलित ई-बसेसचा समावेश होणार आहे. ज्यामुळे राहातील नागरिकांचा प्रवास हा आणखी सुलभ आणि किफायतशीर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५१५० वातानुकूलित ई-बसेससाठी राज्यातील १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जींग स्थानके निर्माण केली जात आहे. याची सुरुवात बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गाने होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MSRTC Electric Bus
Farooq Abdullah: फारुख अब्दुल्ला यांना ईडीने पाठवलं समन्स, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार चौकशी

ठाणे ते नाशिक फक्त ३४० रुपयांमध्ये

दरम्यान, यामध्ये ३४ आसनी मिडी बसही असणार आहे. या संपूर्ण वातानुकूलित बसणार आहात. या बस एका चार्जिंग मध्ये २०० किमी धावू शकतात. या बसेसची केवळ २ तासांत पूर्ण चार्जिंग होते. बसच्या भाड्याबद्दल सांगायचं झालं तर बोरीवली ते नाशिक मार्गावर प्रवास करण्यासाठी नागरिकांना ४०५ मोजावे लागणार.  (Latest Marathi News)

ठाणे ते नाशिक मार्गावर प्रवास करण्यासाठी ३४० रुपये भाडे आकारले जाणार आहे. तसेच यात महिला आणि ६५-७५ वर्ष दरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत असणार आहे. याशिवाय अमृत ज्येष्ठ म्हणजेच ७५ वर्षावरील नागरिकांना तिकिटात शंभर टक्के सवलत असणार आहे.

MSRTC Electric Bus
PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! PM किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे पैसे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

राज्यातील ५००० एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार

दरम्यान, मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला होता.

या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाची दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com