Urmila Kothare Car Accident Saam tv
मुंबई/पुणे

Urmila Kothare Car Accident: अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारला अपघात, मजुरांना चिरडलं; एकाचा मृत्यू; कारचा चक्काचूर

Urmila Kothare car accident update : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : राज्यासहित मुंबईतही अपघाताचं सत्र सुरुच आहे. कुर्ला बेस्ट अपघात आणि घाटकोपर टेम्पो अपघाताची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री देखील कांदिवलीत अपघाताची घटना उघडकीस आली आहे. कांदिवलीत मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात ही घटना घडली आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातात उर्मिला आणि तिचा कार चालक देखील अपघात झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांची सून, अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारला भीषण अपघात झाला आहे. शूटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिला कोठाराच्या कारने दोन मजुरांना उडवल्याची माहिती हाती आहे. मेट्रो प्रकल्पावर काम करणारे हे दोन मजूर असल्याचे प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात उर्मिला आणि तिचा कार चालकही अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवलीतील पोयसर मेट्रो सस्थानकजवळ ही घटना घडली. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना उर्मिला कोठारे यांच्या भरधाव कारने धडक दिली. कारच्या जोरदार धडकेत एका मजुराचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. अभिनेत्री उर्मिला शुक्रवारी रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कारचा चालक आणि अभिनेत्री उर्मिलाही गंभीर जखमी झाली आहे. कारची एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने अभिनेत्रीचा जीव वाचला. या अपघातात तिच्या कारचा मात्र चक्काचूर झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. उर्मिलाच्या कारने उडवलेलेले दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते, अशी माहिती समोर आलेली आहे. मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT