Bathinda Bus Accident : ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नाल्यात कोसळली; 8 जणांचा मृत्यू

Bathinda Bus Accident update : ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर परिसरात एकच धावाधाव सुरु झाली आहे.
५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नाल्यात कोसळली; 8 जणांचा मृत्यू
Bathinda Bus Accident Saam tv
Published On

नवी दिल्ली : पंजाबच्या बठिंडामधून अपघाताची भयंकर घटना घडली आहे. बठिंडामध्ये जोरदार पावसाने घात केला आहे. जोरदार पावसामुळे ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामधील प्रवाशांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नाल्यात कोसळली; 8 जणांचा मृत्यू
Vasai Virar Accident: खेळत असलेल्या चिमुरड्याला टुरिस्ट कारने चिरडलं, थरार सीसीटीव्हीत कैद

बठिंडामध्ये शुक्रवारी बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात बसमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक लोक तातडीने प्रवाशांना वाचवण्यासाठी धावले. यातील काही गंभीर जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नाल्यात कोसळली; 8 जणांचा मृत्यू
Akola Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत कोसळली, अयोध्येवरून परत येताना घडली घटना

अपघात नेमका कसा झाला?

प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, 'परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. नाल्यावरील पुलावर बस कठड्याला धडकली. त्यानंतर ही बस नाल्यात कोसळली. त्यानंतर स्थानिकांनी बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी धाव घेतली. स्थानिकांनी प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. भर पावसात अपघात झाल्याने प्रवाशांना वाचवणे जोखमीचे काम होते. अपघातानंतर काही वेळात एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणली'.

५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नाल्यात कोसळली; 8 जणांचा मृत्यू
Kalyan Girl Murder Case : कल्याण हत्या प्रकरणात ट्विस्ट; आरोपी विशाल गवळीकडं मनोरुग्ण दाखला, पण एका गोष्टीमुळं सस्पेन्स वाढला

घटनेनंतर अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या जवानांनी बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवलं. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी वेळेवर पोहोचल्याने अनेकांचे जीव वाचवले. अन्यथा अनेकांचा जीव गेला असता. या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याची अधिकृत माहिती हाती आलेली नाही. या प्रवाशांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढलं. बस नाल्यात कशी कोसळली, याचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com