Navi Mumbai Local  saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: उरण ते खारकोपरदरम्यान लोकलसेवा स्थगित, प्रवाशांचे हाल, नेमकं कारण काय?

Uran–Kharkopar Local Train: नवी मुंबईतील उरण -खारकोपरदरम्यानची रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पावणेबारा वाजल्यापासून या मार्गावर एकही लोकल धावली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

Priya More

Summary -

  • उरण–खारकोपरदरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प

  • पेट्रोल पाईपलाईन फुटल्याने लोकल सेवा स्थगित केली

  • करंजाडे परिसरात पाईपलाईन फुटल्याची घटना सकाळी ११.४२ वाजता घडली

  • सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व लोकल गाड्या थांबवण्यात आल्या

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. उरण ते खारकोपरदरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पेट्रोलची पाईपलाईन फुटल्यामुळे रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. उरण मार्गावरील सर्व स्थानिकांवरील लोकल सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. या मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी गर्दी केली आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, करंजाडे ते उरण दरम्यानच्या रेल्वे मार्गावर पेट्रोलची पाईपलाईन फुटली. त्यामुळे रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी ११.४२ वाजता घडली. पेट्रोलची पाईपलाईन फुटल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव रेल्वे वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कर्माचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. तेव्हापासून रेल्वे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव खारकोपर ते उरण या मार्गावरील सर्व स्थानिक गाड्यांची सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

पंकजा-धनंजय मुंडे १५ वर्षांनी एकत्र, परळी नगरपरिषदेसाठी युती निश्चित? VIDEO

Heart Attack: पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच बदल ओळखा

Mumbai Shocking : मुंबईची पहिली भेट अखेरची ठरली; उंच इमारतीवरून सळई कोसळून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Accident: घराकडे जाताना भयंकर घडलं, भरधाव वाहनाने ३ जिवलग मित्रांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT