uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

...तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला काहीही धोका नाही - उद्धव ठाकरे

'शिवसेनेने आजपर्यंत अनेक लोकांना कोणतीही पार्श्वभूमी नसताना मोठं केलं.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हा आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच यावेळी त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला तर निष्ठावान कार्यकर्त्यांचे कौतुक केलं.

यावेळी बोलताना ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'शिवसेनेने आजपर्यंत अनेक लोकांना कोणतीही पार्श्वभूमी नसताना मोठं केलं. ज्यांना मोठेपण मिळालं ते सोडून गेले. मात्र, ज्यांना काहीही मिळालं नाही अशी साधी माणसं आजही शिवसेनेसोबत आहेत. जोपर्यंत ही हिमतीची माणसं आपल्यासोबत आहेत. तो पर्यंत शिवसेनेच्या (Shivsena) भवितव्याला कोणीही काहीही धोका पोहचवू शकत नाही.

शिवसेना पक्षा हा काही वस्तू नाही की घेतली आणि पळत सुटला, हा रस्त्यावरचा पक्ष आहे. जनता त्याला आशिर्वाद देत असते. विधानसभेत लोकसभेत याच लोकांच्या जावावर उमेदवार निवडून जात असतात. पक्षातील एखादा नगरसेवक, आमदार गेला म्हणून पक्ष संपत नाही. सगळे आमदार गेले तरी देखील पक्ष अस्तित्वात राहतो. तुम्ही भ्रमात जाऊ नका विधीमंडळ पक्ष वेगळा आणि रस्त्यावरील पक्ष वेगळा.

धनुष्यबाण आपल्याकडेच राहील. जे सोबत राहिलेत त्यांचे जाहीर कौतुक करतो. कारण, काहीही झालं तरी ते हटले नाहीत अजूनही देशात असत्यमेव जयते नसून सत्यमेव जयतेच आहे. तसंच उद्याची याचिका देशातील लोकशाही किती मजबूत आहे हे सांगणारा निकाल आहे. तसंच कायदा, घटनेप्रमाणे जे व्हायचं ते होईलचं असही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, आता काहीजन म्हणत आहेत की, 'मातोश्रीने सन्माने बोलावले तर आम्ही जाऊ असं म्हणाले, त्यांना आजही मातोश्रीबद्दल प्रेम आहे त्यासाठी धन्यवाद. गेली काही वर्ष तुम्ही आज ज्यांच्याकडे गेलात ते ठाकरे कुटुंबियांबद्दल बोलत होते, त्यावेळी तोंड बंद करुन बसला होता. मला माझ्या मुलांना आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांच्या मांडींलामांडी लावून तुम्ही बसला आहात. अशा लोकांनी केलेलं तुम्ही स्वागत स्विकारत आहात.

त्यामुळे तुमचे हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या. आज अनेक मुद्दे आहेत पण मी सगळे बोलणार नाही. काही दिवसात सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेईल. विधानसभेची निवडणुक घ्या. आम्ही चूक असू तर शिक्षा मिळेल. तेव्हा मुख्यमंत्रीपद दिले असते तर हजारो कोटी खर्च करावे लागले नसते. माझ्याकडून वाद विवाद नको. अडीच वर्ष आपल्यावर टीका होत असतांना तुम्ही गप्प होतात असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT