Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

...तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणूक नाही; काँग्रेस नेत्यांसमोर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या (Assembly Speaker Election)निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) मौन सोडलं आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी यासाठी काँग्रेस (Congress) आमदारांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

मुख्यमंत्री आज विधिमंडळात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायला मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे आमदार भेटायला गेले त्या भेटीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी ही मागणी काँग्रेस आमदारांनी केली असता राज्यपाल मंजुरी देत नाहीत तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणूक होऊ शकत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्य सरकारकडून राज्यपालांना तीन वेळा शिष्टमंडळ भेटले आहे, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा प्रस्ताव दिला पण राज्यपालांनी मंजुरी दिली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे या ही अधिवेशनात विधान सभा अध्यक्ष निवडणूक होणाऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

तर दुसरीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांच्याशी चर्चा झाली असून आज उद्या सुप्रीम कोर्टात काय होते हे पहिले जाईल आणि राज्यपालांची भेट मागीतली जाईल. पण या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT