Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

...तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतुक करणार नाहीत; जयंत पाटलांचा टोला

भाजप-राष्ट्रवादी (BJP-NCP) युती अशी कधी चर्चा झाली नव्हती, आमची काँग्रेसबरोबर आघाडी होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आधी गुजरातचे कौतुक केले. आता युपीचे करतील, मात्र जोपर्यंत महाराष्ट्रात त्यांचे बंधू मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करणार नाहीत, असं वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Raj Thackeray) यांनी राज ठाकरेंवरती मिश्किल टिप्पणी केली आहे. तसंच कोणाला सभा करायची तर बंदी करायची गरज नाही असही यावेळी ते म्हणाले.

दरम्यान, तसंच उत्तर प्रदेशमध्ये (UP) योगींनी भोंगे काढले याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले, त्यांनी एखादी गोष्ट केली म्हणजे आपण केले पाहिजे अस नाही. भारतात महागाई प्रचंड वाढली आहे. महागाईचे दुष्परिणाम श्रीलंकेत काय झालं हे दिसतं आहे. केंद्र सराकार जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

भाजप-राष्ट्रवादी (BJP-NCP) युती अशी कधी चर्चा झाली नव्हती, आमची काँग्रेसबरोबर आघाडी होती. आमच्या बरोबर भाजपने चर्चा का केली आम्ही विरोधी पक्षात होतो. या हवेतील गप्पा आहेत. तुम्ही सत्तेत असताना शिवसेना बरोबर असताना तुम्ही आमच्याशी चर्चा का केली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT