Maharashtra rain update Saam tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं; शेतकरी हवालदिल, पुढील ४८ तासांत २४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Maharashtra rain update : महाराष्ट्राला गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसामुले बळीराजा संकटात सापडला आहे.

Saam Tv

महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा दिलाय

राज्यातील अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान

अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात

राज्यात विविध भागांना बुधवारी दुपारी गारपीट आणि अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. या अवकाळीने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अवकाळीने शेतकरी वर्ग संकटात सापडलाय. आता शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट'

राज्यातील 24 जिल्ह्यांना हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. राज्यात पुढील 48 तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहून काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असेही विभागाने सांगितले. उत्तर महाराष्ट्रात उद्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या गडगटासह पडलेल्या पावसाने भोर तालुक्यातील काही गावांना पावसानं झोडपलं. पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ, किकवी, हरिश्चंद्री भागात वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला. सुमारे अर्धा तास बरसलेल्या पावसाने परिसरात पाणीच पाणी झालं. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळं हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली आहे. परंतु आता शेतकऱ्यांना शेतातील पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे.

सिन्नरमध्ये अवकाळी पावसामुळे तारांबळ

नाशिकच्या सिन्नरमध्ये अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. सिन्नरमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अवकाळी आणि गारपिटीचा कांदा, गहू आणि अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

धाराशिवमध्ये शेतकऱ्यांची पिके मातीमोल

धाराशिवमध्ये गारपिटीमुळे होत्याच नव्हत झालं आहे. शेतकऱ्यांचं कांदा पिके मातीमोल झाली आहेत. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा सडला तर शेतकऱ्यांचे तब्बल ४ लाखांचं नुकसान झालं आहे. लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. त्यांनी शासनाने मदत करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. शिरोली एमआयडीसीमध्ये गारांचा पाऊस झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

SCROLL FOR NEXT