rain alert Saam tv
मुंबई/पुणे

ऐन उन्हाळ्यात पावसाचं संकट; राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये अवकाळीची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा

imd weather alert : ऐन उन्हाळ्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये अवकाळीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Akshay Badve

महाराष्ट्रात हवामानात अचानक बदल झालाय

काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीये

सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव, लातूरमध्ये येलो अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. राज्यात काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. तर काही जिल्ह्यात कडक उन्हाने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. यादरम्यान हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे.

ऐन उन्हाळ्यात राज्यात हवामानात बदल होताना दिसत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येत्या २ ते ३ दिवसात तुरळक प्रमाणात अवकाळी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय.

मागील आठवड्यात झालेल्या पावसापेक्षा यंदा अवकाळी पावसाचा जोर कमी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. राज्यातील कोकण किनारपट्टी, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात सध्या उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे येत्या २ दिवसात पारा ३८ अंशाच्या वर जाईल अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलीये.

राज्यातील वाशिम जिल्ह्यात तापमान वाढल्याचे पाहायला मिळालं. वाशिममध्ये ३७.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर धुळ्यात निचांकी तापमान नोंदवलं गेलं. धुळ्यात १३.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं.

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावतोय. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय. ऐन उन्हाळ्यात अवकाळीची एन्ट्री झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पावसामुळे सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये पावसाचं मोठं नुकसान झालंय.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट

धाराशिव जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी गारपिटीच्या संकटामुळे चांगलाच धास्तावलाय. एकीकडे बाजारात द्राक्षांचे भाव कमी झाले आहेत. शेतकरी बाग उतरवत बाजारात द्राक्षे पाठवायला सुरुवात केली आहे. धाराशिवमध्ये मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने फळधारणा कमी झाली होती. त्यातच आता माल काढणीला आला असताना गेल्या आठवड्यात गारपिट झाली. या गारपीटीने द्राक्ष उत्पादकाचं नुकसान झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विधानभवनाबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न

Multani Mitti Hair Mask: लांब आणि दाट केसांसाठी लावा मुलतानी माती हेअर मास्क

Famous Actress : 'ब्रेस्ट सर्जरी केली का?'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या VIDEO नं सोशल मीडियावर धुमाकूळ, नेटकऱ्यांच्या मनात शंकांचं काहूर

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! सरकारी कर्मचाऱ्यांना २० महिन्यांचा एरिअर एकत्र मिळणार? जाणून घ्या कॅल्क्युलेशन

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, प्रसिद्ध मंदिराकडे जाणारा रस्ता बंद; कोणते आहेत पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT