Unknown person threatened to kill PM Narendra Modi and CM Yogi Adityanath  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: PM मोदींसह CM योगींना बॉम्बने उडवून देऊ; मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, आरोपी गजाआड

Mumbai Police threat call: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला.

Satish Daud

Mumbai Police Threat call

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचा दावा केला. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सातत्याने धमकीचे फोन तसेच ई-मेल येत आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने नियंत्रण कक्षाला फोन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी आरोपीने दिली.

आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने जे जे रुग्णालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्या आरोपीने मी कुख्ख्यात गुंड दाऊड इब्राहिमचा माणूस असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांनी (Police) हे प्रकरण गांभीर्याने घेतलं.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा माग काढला. त्यानंतर चुनाभट्टी परिसरातून एका २९ वर्षीय संशयित आरोपीला अटक केली. कामरान खान, असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याने ही धमकी नेमकी कोणत्या उद्देशाने दिली. याचा तपास आझाद मैदान पोलिस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT