Mumbai-Pune Expressway Latest Marathi News
Mumbai-Pune Expressway Latest Marathi NewsSaam TV

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक पूर्णत: बंद

Mumbai-Pune Expressway News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा २ तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
Published on

Mumbai-Pune Expressway Latest News

तुम्ही जर मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा २ तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार असून या ब्लॉक कालावधीत पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai-Pune Expressway Latest Marathi News
Mumbai Air Pollution: वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा; BMCच्या तक्रारीनंतर पोलिसांची धडक कारवाई

त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सरकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघातांच्या घटना घडत आहेत. वाहनचालक बेशीस्तपणे वाहन चालवत असल्याने अपघात होत असल्याचं समोर आलं आहे.

हीच बाब लक्षात घेता रस्ते आणि परिवहन विकास महामंडळाकडून एक्सप्रेस वेवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. वाहनांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे आणि साइन बोर्ड लावण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी विशेष ब्लॉक घेतले जात आहेत.

वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

ब्लॉक कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी हलकी ते जड वाहनांची वाहतूक २ तासांसाठी वळवण्यात येईल. वाहनांची वाहतूक शेडुंग फाटा येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट येथे पुन्हा मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मार्गस्थ करण्यात येणार आहे.

गँट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अर्थात दुपारी २ नंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात. परंतु आज १ तास या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप होणार आहे.

Mumbai-Pune Expressway Latest Marathi News
Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई; 'त्या' दोन्ही पोलिसांच्या बडतर्फीचे आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com