Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई; 'त्या' दोन्ही पोलिसांच्या बडतर्फीचे आदेश

Lalit Patil Case Two Police Dismissed: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फे करण्यात आलं आहे. पोलीस कॉन्स्टेबल नाथा काळे व अमित जाधव अशी बडतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
Lalit Patil Case Two Police Dismissed
Lalit Patil Case Two Police Dismissed Saam TV
Published On

Lalit Patil Case Two Police Dismissed

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फे करण्यात आलं आहे. पोलीस कॉन्स्टेबल नाथा काळे व अमित जाधव अशी बडतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी सोमवारी दोघांच्याही बडतर्फीचे आदेश काढले आहेत. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केली, असा आरोपी दोघांवरही आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lalit Patil Case Two Police Dismissed
Pune Accident News: पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! टेम्पोने 6 वाहनांना दिली धडक, घटना CCTV त कैद

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला ललित पाटील याला उपचारासाठी ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी पोलीस कॉन्स्टेबल नाथा काळे आणि अमित जाधव या दोघांकडे सोपवण्यात आली होती.

दोघेही ड्युटी करीत असताना ललिल पाटील १ ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून पळून गेला होता. पोलिसांचा (Police) कडक पहारा असूनही ललित पाटील रुग्णालयातून पळालाच कसा? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन्ही पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं.

इतकंच नाही, तर दोघांना अटकही करण्यात आली होती. अटकेपासून दोन्ही पोलीस कर्मचारी जेलमध्येच होते. आता त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी सोमवारी याबाबतचे आदेश काढले आहे.

दुसरीकडे ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांच निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी समितीला दोषी आढळलेल्या या दोन्ही डॉक्टरांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.

Lalit Patil Case Two Police Dismissed
Rashi Bhavishya: सूर्य-मंगळाच्या युतीने महापुरुष योग; 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com