Badlapur, Badlapur Crime News  saam tv
मुंबई/पुणे

बदलापुरात माजी नगरसेवकावर हल्ला, आधी बंदूक दाखवत कार अडवली, नंतर मारहाण

हा हल्ला नेमका कुणी आणि का केला ? हे आता पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होऊ शकणार आहे.

अजय दुधाणे

बदलापुर : बदलापुरात (badlapur) येथे माजी नगरसेवक आऊ मोरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात माजी नगरसेवक आऊ मोरे हे जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर माेरे यांना बदलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली. (Badalapur Latest Marathi News)

अविनाश उर्फ आऊ मोरे हे मंगळवारी रात्री शिरगाव परिसरातील त्यांच्या घरी गाडीतून जात हाेते. त्यावेळी अज्ञात ४ ते ५ लाेकांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर त्यांना गाडीतच मारहाण करण्यात आली. ही मारहाण ४ ते ५ जणांनी केल्याचे माेरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

त्यातील काहींनी मला बंदुकीचाही धाक दाखवला असेही माेरेत यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात मोरे यांच्या नाकाला आणि तोंडाला इजा झाली आहे. या हल्ल्यानंतर मोरे यांना बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस (police) ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला नेमका कुणी आणि का केला ? हे आता पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होऊ शकणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

SCROLL FOR NEXT