Manasvi Choudhary
अवघ्या काही दिवसांवर नवरात्री उत्सव सुरू होणार आहे. नवरात्रीमध्ये गरबा खेळण्यासाठी तरुणी आणि महिला पारंपरिक पोशाख करतात.
नवरात्रीमध्ये गरब्यासाठी घागरा-चोळी नसेल तर तुम्ही घेरदार अनारकली सूट परिधान करू शकता. सध्या बाजारात अनेक लेटेस्ट पॅटर्नचे अनारकली ट्रेंडमध्ये आहेत. गरब्यासाठी ५ ट्रेंडी अनारकली सूट सेट या वेबस्टोरीतून पाहूया.
सिल्क एम्ब्रॉयडरी अनारकली सूट बेस्ट आहेत. डार्क कलरमधील लेटेस्ट पॅटर्न फेस्टिव्हलसाठी तुम्ही निवडू शकता.
क्लोसिया या अनारकली सूटमध्ये बारीक नक्षीकाम केलेले असते जे अत्यंत उठून दिसते. तुम्ही खास गरब्यासाठी हा घेरदार अनारकली सेट तुम्ही निवडू शकता.
नवरात्रीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टायलिश ड्रेस हवा असेल तर तुम्ही फ्लोरल किंवा ज्युमेट्रिक प्रिंट असलेले प्रिंटेड अनारकली सूट निवडा.
राजस्थानी पारंपरिक स्टाईलमध्ये लेहरिया किंवा बांधणी पॅटर्नचे अनारकली सूट तुम्ही गरब्यासाठी निवडू शकता जे अत्यंत स्टायलिश दिसतात.
प्लेन अनारकली कुर्तीसोबत एखादा हेवी वर्क असलेला बांधणी किंवा सिल्कचा दुपट्टा कॅरी केल्यास तुमचा गरबा लूक परफेक्ट दिसेल.