Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक कोपऱ्याचा आणि खोलीचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होत असतो.
घरातील बाथरूम हे केवळ आंघोळ करण्याचे ठिकाण नाही, तर ते घरातील ऊर्जेच्या प्रवाहाला देखील प्रभावित करते. जर बाथरूमची रचना किंवा तेथील वस्तू वास्तूच्या नियमांनुसार नसतील, तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बाथरूमची रचना योग्य दिशेला असणे अत्यंत गरजेचे आहे. घरामध्ये बाथरूम वायव्य किंवा पश्चिम दिशेला असणे सर्वात शुभ मानले जाते.
अनेकदा काम झाल्यानंतर आपण बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. दरवाजा उघडा राहिल्यास त्यातून नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरू शकते.
घराच्या बाथरूममधील नळांमधून सतत पाणी टपकणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. वास्तूनुसार पाण्याचा असा अपव्यय म्हणजे पैशांची उधळपट्टी किंवा आर्थिक नुकसान मानले जाते.
मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे नैसर्गिक घटक मानले जाते. बाथरूम स्वच्छ करताना मीठाचा वापर करा. तसेच एका छोट्या वाड्यात खडे मीठ ठेवून ते बाथरूमच्या कोपऱ्यात किंवा उंच ठिकाणी ठेवावे आणि दर आठवड्याने ते मीठ बदलून टाकावे.
बाथरूमच्या भिंतींना नेहमी फिकट रंग द्यावेत. पांढरा, हलका निळा किंवा फिकट गुलाबी यांसारखे रंग मनाला प्रसन्न देतात.
बाथरूममध्ये हवेशीर खिडक्या असाव्यात, जेथून सूर्यप्रकाश आणि ताजी हवा खेळती राहील. यामुळे बाथरूममध्ये ओलावा, दुर्गंधी किंवा बुरशी साचून राहत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.