Universal Pass Compulsory in PMPML Saam Tv News
मुंबई/पुणे

Universal Pass: पुण्यात PMPML बस प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पासची सक्ती

Universal Pass: PMPML बसमधून प्रवास करताना आता दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास बंधनकारक राहणार आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमि़क्रॉनमुळे करण्यात आलेल्या नवीन बंधनाच्या पार्श्वभूमीवर पीएपीएल प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पासची सक्ती करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाने (PMPML) घेतला आहे. प्रवास करताना आता दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास बंधनकारक राहणार आहे. आजपासून (सोमवार) याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. (Universal Pass Compulsory in PMPML buses from monday)

हे देखील पहा -

युनिव्हर्सल पास (Universal Pass) अथवा दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र (Corona Vaccination Certificate) नसल्यास प्रवाशांना बसमधून प्रवास करता येणार नसल्याचे पीएमपीएलचे (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी स्पष्ट केले आहे. पीएमपीएल प्रशासनाने कोरोनाच्या (Corona) नियमांचे बसमध्ये कडक पालन करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंलजबजावणी करण्याकरता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात वाहकांना सूचना देण्यात येणार असल्याची माहिती झेंडे यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर बसमध्ये सुध्दा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT