narayan rane and uddhav thackeay  saam tv
मुंबई/पुणे

मंत्रालयात जात नव्हता, तो कसला मुख्यमंत्री ? गणरायाला साकडं घालतानाच नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पेटला आहे. शिवसेनेवर पक्षसंकट असताना नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल सुरूच आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Narayan Rane News : जेष्ठ नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यावर राज्यातील राजकारण बदललं आहे. राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पेटला आहे. शिवसेनेवर पक्षसंकट असताना नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल सुरूच आहे. मंत्रालायत जात नव्हता, तो कसला मुख्यमंत्री ? असा सवाल करत नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नारायण म्हणाले, 'गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो. मी एकच प्रार्थना करतो की, गणरायाने मला सर्व काही दिलं आहे. मी एकच मागणी करतो की, गणराया माझी माणुसकी कायम ठेव'.

नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'भाजपसोबत निवडून यायचे आणि मग गद्दारी करायची. आता ते सरकार गेले आहे. सत्तेसाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. एक दिवसही त्यांना त्या पदावर ठेवण्याची लायकी नव्हती. मंत्रालयात जात नाही, तो कसला मुख्यमंत्री ?, असा सवाल करत नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

'शिंदे-फडणवीस सरकार हे पर्मनंट सरकार आहे. कंत्राटी सरकार गणरायाने खाली खेचलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने एक जण टिवटिव करतोय. नवीन सराकर हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने आले आहे, असे नारायण राणे म्हणाले.

दसरा मेळाव्यावर भाष्य करताना नारायण राणे म्हणाले, 'दसरा मेळावा झाला तर, तो एकनाथ शिंदेंचा होईल. जर मला एकनाथ शिंदेंनी बोलावलं तर मी नक्की जाईन. शिंदेंच्या मंचावर जुने शिवसैनिक असतील'. आगामी मुंबई महानगर पालिकेवरही नारायण राणे यांनी भाष्य केलं. 'मुंबई महानगर पालिका लुटली, ज्यांनी मुंबई बकाल बनवली . त्यांना खाली खेचायचे आहे. त्यांना घरी पाठव आणि भाजपला ही पालिका स्वाधीन कर आणि भाजपची सत्ता येईल असे मी मागणे करतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

SCROLL FOR NEXT