'शहाजी बापू पाटील हे करमणुकीचं पात्र, सरकारमधील ते 'जॉनी लिव्हर'

शेतकऱ्यांवरील संकट जाऊ दे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळु दे अशी प्रार्थना यावेळी मिटकरी कुटुंबियांनी गणरायास केली.
Amol Mitkari , shahaji bapu patil
Amol Mitkari , shahaji bapu patilsaam tv

Amol Mitkari News : सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये शहाजी पाटील हे करमणुकीचं पात्र आहे. ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही असा टाेला आमदार अमाेल मिटकरी (amol mitkari) यांनी शहाजी बापू पाटील यांना लगावला आहे. मिटकरी हे अकाेला येथे बाेलत हाेते.

आमदार शहाजी पाटील यांनी अमोल मिटकरी यांचा संजय राऊत (sanjay raut) होणार असं वक्तव्य नुकतेच केले हाेते. अमोल मिटकरींनी आमदार शहाजी पाटलांच्या वक्तव्यास प्रत्युत्तर देत ते सध्याच्या सरकारममधील करमणुकीचं पात्र आहे असे म्हटलं आहे.

Amol Mitkari , shahaji bapu patil
Sangloa Ganeshotsav : चर्चा तर हाेणारच ! शहाजी बापूंच्या सांगाेल्यात पाेलिसांची एकदम ओके कारवाई

अमाेल मिटकरी म्हणाले शिंदे गटाचे ते जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही. त्यांच्या मतदारसंघात शून्य विकास आहे. 'माझी' काळजी न घेता, शिंदे गटात त्यांची कशी पायखेचनी सुरु आहे. याची काळजी घ्यावी असंही मिटकरींनी नमूद केले.

मिटकरी म्हणाले शिंदे गटात कितीही डायलॉग बाजी केली तर तुम्हांला कॅबिनेट सोडा साधं राज्यमंत्री हे पद देखील भेटणार नाही. त्यांची ही शेवटीचं टर्म राहील असेही मिटकरींनी नमूद केले.

राज ठाकरेंना टाेला

दरम्यान गणपती स्थापनेवरूनही मिटकरींनी आज राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. अनेक लोक अमोल मिटकरी यांना नास्तिक म्हणतात या संदर्भात बोलले आहेत. काही लोक आजही दीड दिवसाचा गणपती बसवतात, मात्र मी पूर्णपणे दहा दिवसाचा गणपती बसवतोय असा टाेला मिटकरींनी ठाकरेंना हाणला.

Amol Mitkari , shahaji bapu patil
Ganpatipule : ...अन् मयेकर देवासारखे धावून गेले; गणपतीपुळ्यातील समुद्रात बुडताना नांदेडच्या गणेशभक्ताचा वाचला जीव

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले. मिटकरी यांच्यासह पत्नी कविता तसेच संपूर्ण कुटूंबाने गणरायाची पूजा अर्चा केली. शेतकऱ्यांवरील संकट जाऊ दे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळु दे अशी प्रार्थना यावेळी मिटकरी कुटुंबियांनी गणरायास केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com